इरकॉन ते आरव्हीएनल रेल्वे स्टॉक्स सुस्साट, शेअर बाजारात दमदार कामगिरी, गुंतवणूकदार मालामाल
Marathi June 04, 2025 08:26 PM

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 देखील तेजी पाहायला मिळतेय. आज भारतीय शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी 4 जून म्हणजे आज जोरदार खरेदी केली. यामुळं रेल्वे कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. यामध्ये इरकॉन इंटरनॅशनल,रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग , आरव्हीएनल, आयआरएफसी, टिटागढ रेल सिस्टीम्स, कॉन्कॉरच्या शेअरमध्ये वाढ झाली. 

इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये आज 14 टक्के तेजी पाहायला मिळाली. गेल्या 20 आठवड्यातील मोठी तेजी पाहायला मिळाली. ईस्टर्न सेंट्रल रेल्वे कडून 1068.3 कोटी रुपयांचं कंत्राट मिळाल्याचं समोर आल्यानंतर या शेअरमध्ये तेजी दिसून आली. इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर 26.52 रुपयांनी वाढून 220.46 रुपयांवर पोहोचला.  

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी दिसून आली. सध्या रेलटेलचा शेअर 442.05 रुपयांवर पोहोचला आहे. 

टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरींगच्या शेअरमध्ये 7.24 टक्क्यांची वाढ झाली. टेक्समॅकोचा शेअर 171.98 रुपयांवर पोहोचला आहे. आरव्हीएनएलच्या शेअरमध्ये 6.49 टक्क्यांची वाढ झाली. आरव्हीएनलच्या शेअरमध्ये 26.20 रुपयांची वाढ होऊन तो 429.95 रुपयांवर पोहोचला आहे. टिटागढ रेल सिस्टीम्सच्या स्टॉकमध्ये 31 रुपयांची वाढ होऊन तो 930.05 रुपयांवर पोहोचला आहे. तर, बीईएमएल आणि आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये फार तेजी दिसून आली नाही.  

भारतीय शेअर बाजारात या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये थोडी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 260.74 अकांची तेजी दिसून आली. आजच्या दिवसाचं बाजाराचं कामकाज संपलं तेव्हा सेन्सेक्स 80998.25 पर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांकात नाममात्र तेजी दिसून आली. निफ्टी 50 केवळ 77.70 अंकांनी वाढून 24620 पर्यंत पोहोचला. 

रेल्वे स्टॉक्समध्ये तेजी गुंतवणूकदार मालामाल 

भारतीय  रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या स्टॉकमध्ये वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.  रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आल्यानं गुंतवणूकदार मालामाल झाले. एकीकडे रेल्वेचे स्टॉक चांगली कामगिरी करत असताना आयआरएफसीमध्ये मात्र केवळ 4.14 रुपयांची वाढ झाली. आयआरएफसीचा स्टॉक सध्या 144 रुपयांवर आहे. दुसरीकडे आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये 5.75 रुपयांची वाढ होऊन तो 777.25 रुपयांवर पोहोचला आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.