जोगेश्वरीत नाल्यावरील झाकणे धोकादायक
esakal June 04, 2025 10:45 PM

जोगेश्वरीत नाल्यावरील झाकणे धोकादायक
जोगेश्वरी, ता. ४ (बातमीदार) ः जाेगेश्वरी पूर्वेच्या सर्वोदयनगर मार्गावरील कब्रस्तानजवळील रस्त्याच्या वळणावरील झाकणे गेल्या अनेक महिन्यांपासून तुटली आहेत. त्यामुळे येथे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
येथे जवळच कब्रस्तान असल्याने व विभागातील हे एकमेव कब्रस्तान असल्याने दफनविधीसाठी नागरिकांची वर्दळ असते. मोठे टेम्पो, कचऱ्याची वाहने बिनधास्तपणे या वळणावरील नाल्यावरून जातात. त्यामुळे नाल्यावरील सर्वच झाकणे तुटली आहेत. तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. लवकरात लवकर नवी झाकणे बसवावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.