Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पालक पनीर चीझ सँडविच, लगेच लिहून घ्या रेसिपी
esakal June 06, 2025 03:45 PM

Palak Paneer Sandwich: सकाळी नाश्त्यात रोज एकाच प्रकारचे सँडविच खाऊन बोरं झाले असेल तर आज वेगळ्या प्रकारचे सँडविच बनवू शकता. तुम्ही सकाळी पालक पनीर चीझ सँडविच बनवू शकता. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सँडविच आवडेल. हे सँडविच कमी वेळेत तयार होते. तसेच पालक पनीर चीझ सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

पालक पनीर चीझ सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बारिक चिरलेला पालक

पनीर

बारिक चिरलेली हिरवी मिरची

बारिक चिरलेला कांदा

स्वीट कॉर्न

चिली फ्लेक्स

मीठ

बटर

पालक पनीर चीझ सँडविच बनवण्याची कृती

पालक पनीर चीझ सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी पालक वाफवून बारीक चिरावे. नंतर पनीरमध्ये बारीक पालक, कांदा,स्वीट कॉर्न,मीठ,चिली फ्लेक्स सर्व चांगले मिसळा. नंतर ब्रेडवर मायो आणि टोमॅटो सॉस लावा. नंतर मिश्रण त्यावर टाका आणि चिझ स्लाइस ठेवा. नंतर त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवा आणि गरम तव्यावर चांगले भाजून घ्या. पालक पनीर चीझ सँडविच तयार असून आस्वाद घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.