Rohit Pawar lashed out at Ajit Pawar for focusing on the elections of Malegaon Cooperative Sugar Factory in Baramati taluka
Marathi June 04, 2025 11:26 PM


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी या निवडणुकीचे गांभीर्य लक्षात 2 जून रोजी इच्छुकांशी संवाद साधला. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. 

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. जवळपास 19 हजार 700 सभासद असणाऱ्या कारखान्याच्या 21 संचालक पदांच्या जागांसाठी 22 जून रोजी मतदान पार पडणार आहे. सदर कारखाना बारामती तालुक्यातील सहकारातील महत्त्वाची संस्था असल्याने या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी या निवडणुकीचे गांभीर्य लक्षात 2 जून रोजी इच्छुकांशी संवाद साधला. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.  (Rohit Pawar lashed out at Ajit Pawar for focusing on the elections of Malegaon Cooperative Sugar Factory in Baramati taluka)

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांना विचारण्यात आले की, निधीवाटपावरून मित्रपक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने अजित पवारांवर टीका होताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवारांच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत. या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांवर टीका झाली की, त्यांच्या पक्षातील कुणीच पुढे येत नाही. पण अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली, तर त्यांच्या पक्षातील लोकं तुटून पडतात. त्यामुळे  अजित पवार पक्षात एकटे पडले आहेत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. याचपार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले की, अशावेळी एका पवारांना साथ द्यायला दुसरे पवार जातील का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या पक्षात देखील पवार आहेत म्हणजेच सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार आहेत, असे म्हणत त्यांनी जास्त बोलणं टाळलं.

हेही वाचा – Sanjay Raut : हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा, कुर्ला मदर डेअरीची जागा अदानीला दिल्याने राऊतांचा आरोप

रोहित पवारांना विचारण्यात आले की, अजित पवार सध्या कारखाना निवडणुकीत देखील लक्ष घालत आहेत. या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार सध्या एकटे पडले म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागत आहे. त्यांच्या पक्षातील दुसरी तिसरी फळी कुठे आहे? त्यांच्या पक्षाचे नेते काय करत आहेत? असे प्रश्न उपस्थित करत उद्या अजित पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत देखील लक्ष घालाव लागेल, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला.

सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून पॅनेल उभं करतील

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कारखाना निवडणुकीत का नाही? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही, याबाबत मी आता बोलणार नाही. कारण पक्षाने आता माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. परंतु माझ्या माहितीनुसार 13 तारखेपर्यंत अर्ज मागे घ्यायचा आहे. त्यामुळे आमचं पैनल निवडणुकीत नाही, असं अजिबात म्हणता येणार नाही. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार मिळून एक पॅनेल उभं करत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

हेही वाचा – Girish Mahajan : कौल फौल कोण ते माहीत नाही, राऊतांच्या आरोपांवर मंत्री महाजनांचे कानावर हात



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.