प्लॅस्टिकही बनू शकते पर्यावरणस्नेही, रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुनर्वापरासाठी पुढाकार
Marathi June 05, 2025 07:27 AM

प्लॅस्टिक हा भस्मासुर राहिला नसून ते योग्यपणे हाताळले तर हरित आणि समतावादी जगासाठी महत्त्वाचे ठरेल. योग्य वापर केल्यास प्लॅस्टिक हे पर्यावरणात पर्यावरणाचे स्नेही आहे, ते प्रदूषण कमी करून जागतिक व्यापाराला सहाय्य करू शकते, असे इकॉनॉमिस्टच्या 2025 च्या महत्त्वपूर्ण विश्लेषणात म्हटले आहे. दरम्यान, अत्याधुनिक पद्धतीच्या प्लॅस्टिक पुनर्वापर तंत्राने प्लॅस्टिक पृथ्वीच्या आरोग्याशी सुसंगत व्हावे यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने विविध ब्रँडची निर्मिती करून पुढाकार घेतला आहे.

पुनर्वापरास योग्य नाही अशा प्लॅस्टिकचा पिरोलिसीस किंवा एन्झाईम पद्धतीने वापर केल्यास उच्च दर्जाचे साहित्य तयार होते. त्याचा वापर पॅकिंग किंवा वस्त्राsद्योग क्षेत्रात करण्याच्या पद्धतीदेखील मुरा टेक्नॉलॉजी किंवा संसारा इको या पंपन्यांनी शोधल्या आहेत. हिंदुस्थानात निर्माण होणाऱया 55 लाख टन प्लॅस्टिक कचऱयापैकी 60 टक्क्यांवर पुनर्प्रक्रिया होते.

पर्यावरणपूरक जागतिक मॉडेलची निर्मिती

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लॅस्टिक पुनर्वापर संदर्भातील यशामुळे पर्यावरणपूरक जागतिक मॉडेलची निर्मिती झाली आहे. रेक्रॉन, ग्रीन गोल्ड हे ब्रँड, तर वापरलेल्या शीतपेयाच्या प्लॅस्टिक बाटल्यांपासून आकर्षक कपडे आणि घरगुती साहित्य बनवण्यासाठी उच्च दर्जाचे पॉलिएस्टर आणि अन्य साहित्य तयार करतात. यासाठी वर्षभर ते दोन अब्ज प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.