RCB Rally Stampede : RCB च्या रॅलीतील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार
Sarkarnama June 06, 2025 01:45 AM
RCB Rally Stampede : न्यायालयीन चौकशीचे आदेश

कर्नाटकातील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ क्रिकेटप्रेमींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामध्ये कुणालाही आरोपी करण्यात आलेले नाही. कर्नाटक हायकोर्टाने या घटनेची दखल घेतली आहे. आयपीएलचे पहिल्यांदाच विजेतेपद मिळविलेल्या आरसीबी संघासाठी स्टेडियममध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.