Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात;अक्षयच्या चार वर्षांतील चित्रपटांपेक्षा सर्वात मोठी ओपनिंग
Saam TV June 06, 2025 07:45 PM

Housefull 5 Box office collection Prediction : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'हाउसफुल 5' या बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपटाने 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या प्री-रिलीज पीआरमुळे आणि 'हाउसफुल' फ्रँचायझीच्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ट्रेड अॅनालिस्ट रोहित जैस्वाल यांच्या मते, 'हाउसफुल 5' भारतात पहिल्या दिवशी 20 ते 22 कोटी रुपयांची कमाई करणार आहे, ज्यामुळे हा चित्रपट अक्षय कुमारच्या गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरू शकतो.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही चांगली कमाई केली होती. 'हाउसफुल 5' ने पहिल्या दिवशीच्या अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 13.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे चित्रपट नक्की हिट ठरेल असे बोलले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मंसुखानी यांनी केले असून, साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केली आहे.

'' ची कथा एका आलिशान क्रूझवर घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित आहे, जिथे एका अब्जाधीशाचा मृतदेह सापडतो आणि त्यानंतर क्रूझवर गोंधळ सुरू होतो. चित्रपटात , अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, फर्दीन खान, जॅकलीन फर्नांडिस, नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 'हाउसफुल 5' दोन वेगवेगळ्या क्लायमॅक्ससह प्रदर्शित झाला आहे – 'हाउसफुल 5A' आणि 'हाउसफुल 5B', ज्यात वेगवेगळे खुनी दाखवले गेले आहेत .

या चित्रपटाच्या यशामुळे 'हाउसफुल' फ्रँचायझीच्या एकूण कमाईत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. 'हाउसफुल' मालिकेच्या मागील चार चित्रपटांनी एकत्रितपणे सुमारे 497.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, आणि 'हाउसफुल 5' च्या यशामुळे ही कमाई 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.