Man Stabbed Over Loan Dispute : उसने पैसे परत घ्यायला बोलावून एकावर हल्ला
esakal June 06, 2025 08:45 PM

टीव्ही सेंटर : हात उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणाला चौघांनी मारहाण केली; तसेच चाकूने प्राणघातक हल्ला केला.

यात तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार मंगळवारी (ता. तीन) रात्री नऊच्या सुमारास जळगाव रोडवरील प्यासा वाइन शॉपसमोर घडला. याप्रकरणी चौघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तक्रारीनुसार, सतीश अशोक प्रधान (वय ३६, रा. सिकंदर कॉलनी, मिसारवाडी) यांनी अजय संतोष काकडे (रा. सावंगी हर्सूल) याला उसने पैसे दिले होते.

ते परत देण्याच्या बहाण्याने अजय याने मंगळवारी रात्री प्यासा वाइन शॉपसमोर त्यांना बोलावले. प्रधान हे ठरलेल्या ठिकाणी पोचताच, अजय आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी मिळून त्यांना वरून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यानंतर अजयने चाकूसारख्या धारदार वस्तूने त्यांच्या पाठीवर वार केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.