बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या दीपिका आई झाली असून ती मुलीला साभाळण्यात व्यस्त आहे. लवकरच ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु तरी तिच्या जुन्या प्रेमकहाण्या चर्चेत येतात.
मॉडेल आणि अभिनेता मुजम्मिल इब्राहिम हिच्यासोबत दीपिकाचं अफेअर होतं. दोन वर्ष ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दीपिकाच्या सुरुवातीच्या काळात मुजम्मिल तिच्यासोबत होता. 2003 मध्ये मुजम्मिल हा मिस्टर इंडियाचा किताब सुद्धा जिंकला आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगच शिक्षण सुद्धा घेतलं आहे.
मुझम्मिल इब्राहिमच्या कुटुंबानं दहशतवादामुळे काश्मिर सोडलं आणि मुंबईत आले. त्यानंतर त्याने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान त्याची ओळख दीपिकाशी झाली. त्यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केलं.
इब्राहिम हा लहानपणापासून हुशार होता. त्याला राष्ट्रपतीकडून 'जीवन रक्षा पदक' हा पुरस्कार मिळाला आहे. त्याने स्विमिंग पुलमध्ये बुडणाऱ्या मुलाला वाचवलं होतं. तसंच त्याने एका वृद्ध महिलेला सुद्धा पाण्यात बुडताना वाचवलं होतं. तो मॉडलिंग बरोबरच नॅशनल स्विमिंग चॅम्पियन सुद्धा आहे.