मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेशासाठी नव्याने अर्ज करण्याची संधी
esakal June 07, 2025 12:45 AM

पदवी प्रवेशासाठी नव्याने अर्ज करण्याची संधी
मुंबई विद्यापीठात प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीचे नवीन वेळापत्रक
मुंबई, ता. ५ : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार तीन गुणवत्ता याद्या जाहीर केल्या आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यानुसार शुक्रवार (ता. ६) ते १० जून या कालावधीत ऑनलाइन लिंकवर प्रवेशपूर्व नाव नोंदणी करता येणार आहे. या कालावधीत प्राप्त झालेले आणि आधीचे प्राप्त झालेले प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीचे अर्ज यांची एकत्रित यादी तयार करून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अशा अनुषंगाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रवेशपूर्व नोंदणीचे नवीन वेळापत्रक
- प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) : ६ ते १० जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
- चौथी गुणवत्ता यादी : ११ जून (सकाळी ११ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ११ ते १३ जून (संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)
- पाचवी गुणवत्ता यादी : १४ जून (दुपारी १२ वाजता)
- ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : १४ ते १८ जून (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.