खुल्या निबंध स्पर्धेमध्ये संजय बांबुळकर प्रथम
esakal June 07, 2025 12:45 AM

68601

खुल्या निबंध स्पर्धेमध्ये
संजय बांबुळकर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील संजय बांबुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षनिमित्त प्राथमिक शिक्षक पतपेढीने विविध उपक्रम राबविले होते. यापैकी खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी आज जाहीर केला. सहकार या विषयावर आधारित खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम संजय बांबुळकर (मळेवाड, सावंतवाडी), द्वितीय संतोष वारंग (वालावल, कुडाळ), तृतीय नीता सावंत (शिरशिंगे, सावंतवाडी), उत्तेजनार्थ सतीश कदम (कांदळगाव, मालवण), उत्तेजनार्थ कृष्णा साळी (भिवंडी, ठाणे) यांनी प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षण संस्थेचे अध्यक्ष पाताडे व तज्ज्ञ संचालक किशोर कदम यांनी केले. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना १२ तारखेला दुपारी २.३० वाजता संस्थेच्या सभासद सत्कार कार्यक्रमात संस्थेचे प्रधान कार्यालय सभागृहात गौरविण्यात येणार आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष पाताडे व उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.