Noshaba Shehzad: ही आहे पाकिस्तानी गुप्तहेरांची 'आका'; 'मॅडम एन' ने 500 युट्यूबरला ओढलं जाळ्यात
Sarkarnama June 07, 2025 06:45 AM
Who Is Madam n Noshaba Shehzad युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच्या अटकेनंतर देशात अनेक पाकिस्तानी गुप्तहेरांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. Who Is Madam n Noshaba Shehzad सुमारे पाच हजार युट्युबरना आपल्या जाळ्यात ओढणारी 'मॅडम एन'सध्या चर्चेत आहे. तिच्याबाबत जाणून घेऊया Who Is Madam n Noshaba Shehzad लाहोरमध्ये 'ट्रॅव्हल एजन्सी' चालवणाऱ्या पाकिस्तानी बिझनेस वुमन नोशाबा शहजाद हीने ज्योती मल्होत्रासह भारतातील अनेक युट्यूबर्सना मदत केल्याचे आढळले आहे. Who Is Madam n Noshaba Shehzad पाकिस्तानात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या युट्युबरना तिने मदत केली. त्यानंतर तिनं त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला. Who Is Madam n Noshaba Shehzad आयएसआयने नोशाबा शहजादचे कोड नेम 'मॅडम एन' ठेवलं आहे. तिचा पती पाकिस्तानी नागरी सेवेतील निवृत्त अधिकारी आहे Who Is Madam n Noshaba Shehzad 'मॅडम एन'ने भारतात सुमारे ५०० हून अधिक गुप्तहेराचं स्लीपर सेल जाळे तयार केले आहे. Who Is Madam n Noshaba Shehzad दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात शहजादला सहज प्रवेश मिळत होता. तिला हव्या असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानचा व्हिसा सहज मिळत होता. Who Is Madam n Noshaba Shehzad तिच्या एका फोनवर व्हिसा मिळत असे, एवढा तिचा दरारा आहे. त्यातूनच तिनं पाच हजाराहून अधिक भारतीय युट्युबर्सला आपल्या जाळ्यात ओढले आहे. Who Is Madam n Noshaba Shehzad सहा महिन्यात भारतातील 3 हजार नागरिक आणि दीड हजार अनिवासी भारतीयांना पाकिस्तानात पाठविण्यात तिनं मदत केली होती. NEXT: आमदारकीची हॅट्रीक, विलासरावांचे मुख्यमंत्रिपद अडचणीत आणणारा माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.