लाडकी बहीण योजनेतील ‘या’ महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
Marathi June 08, 2025 01:26 AM

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, योजनेच्या शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपयांची रक्कम दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मा निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून 12000 रुपये मिळतात. याचा संदर्भ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी जोडण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसानच्या दोन्ही योजनेचे मिळून 12000 रुपये मिळत असतील. तर, महाराष्ट्र सरकारच्या डीबीटी संदर्भातील धोरणानुसार थेट खात्यात रक्कम पाठवण्याची मर्यादा 18000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलेला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानचे 12000 रुपये मिळत असतील तर त्यांना दर उर्वरित 6000 रुपयांची रक्कम 500 रुपये दरमहा अशी दिली जाते. त्यामुळं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीला दरमहा योजनेतून 500 रुपये मिळतात. यासंदर्भातील नियम योजनेच्या मूळ शासन निर्णयात आहे.

किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना 500 रुपये दिले जातात त्यांची आकडेवारी जाहीर केली होती. पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मानचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांची संख्या  774148 इतकी आहे. या लाडक्या बहिणींना दरमहा 500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल केलेले नाहीत. योजनेच्या शासन निर्णयामध्येच हे निकष होते. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो.

लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळाली?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. तेव्हापासून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना काही वेळा दोन महिन्यांची रक्कम एकत्रित देण्यात आली होती. महायुतीच्या घटकपक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100  रुपये देण्याची घोषणा केली होती. निवडणुकीतील त्या घोषणेची अंमलबजावणी महायुती कधी करणार याकडे लक्ष लागलंय.लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे मिळून 16500 रुपये मिळाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.