साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 8 जून 2025 ते शनिवार 14 जून 2025
Marathi June 08, 2025 10:27 AM

>> निळा मध्ये प्रमुख

मेष – लोकप्रियता वाढेल

मेषेच्या पराक्रमात बुध, चंद्र-गुरू प्रतियुती. विरोधकांना योग्य प्रकारे शह देऊन तुमचा कार्यभाग साधता येईल. क्षुल्लक तणाव दूर करू शकाल. नोकरीमध्ये बुद्धीची  प्रशंसा, बढती, उत्तम बदल. धंद्यात वाढ. नवे धोरण यशस्वी. कठीण कामे कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत अनेकांना योग्य प्रकारे शह देऊन वर्चस्व सिद्ध कराल. डावपेच नव्या पद्धतीचे शोधाल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत यश. चांगला दिवस 12, 13

वृषभ – नोकरीत प्रभाव

वृषभेच्या धनेषात गुरू, चंद्र-बुध प्रतियुती. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे अडचणींवर मात करणे कठीण होणार नाही. नोकरीत प्रभाव दिसेल. मित्र, सहकारी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात गोड बोला, फसगत टाळा. व्यावहारिक चर्चेत यश. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत पुढे जाण्याची संधी. योजना पूर्ण करण्यावर भर द्या. दिग्गज व्यक्तींचा सहवास, ज्ञानात भर पडेल. सन्मान वाढेल. चांगला दिवस 9, 10

मिथुन – सहनशक्ती ठेवा

स्वराशीत गुरू, बुध-प्लुटो षडाष्टक योग. शाब्दिक चकमक वाढेल. कायदा सर्वत्र पाळा. चांगल्या संधीची वाट पाहा. कुठेही अतिशयोक्ती, घाई नको. नोकरीत वरिष्ठांना नाराज करू नका. धंद्यात प्रेमाने वागा, वसुली करा, चातुर्य वापरा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोधकांचा, वरिष्ठांचा दबाव राहील. सहनशक्ती ठेवा. अहंकार नको. चांगला दिवस 11, 12

कर्करोग अनाठायी खर्च टाळा

कर्केच्या व्ययेषात गुरू, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग. दुसऱयांच्या मताचा, विचारांचा अनादर होऊ देऊ नका. डोळय़ांची काळजी घ्या. अनाठायी खर्च टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. नोकरीत अस्थिरता राहील. सामोपचाराने वागा. धंद्यात चूक नको.  हिशेब तपासा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिस्पर्धी वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतील. विवेकबुद्धी जागृत ठेवा म्हणजे प्रतिष्ठा जपता येईल. चांगला दिवस 8, 9

सिंह – नोकरीत बढती

बुध-शुक्र लाभयोग. बुध-गुरू युती. कठीण कामे मार्गी लावता येतील. संताप करू नका. शांत डोक्यानेच कामे त्वरित पूर्ण होतील. नोकरीत बढती, कामाचे कौतुक. कायद्यासंबंधी समस्या रेंगाळत ठेवू नका. धंद्यात मोठे काम, लाभ. कर्जाचे काम करा, वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रगतीची संधी. विरोधक कौतुक करतील. अनेक योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत यश, नावलौकिक. चांगला दिवस 8, 12

कन्या – नोकरीत वर्चस्व राहील

कन्येच्या दशमेषात गुरू. बुध- गुरू युती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, यशाचा. प्रवासात काळजी घ्या, प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. कठीण कामे पूर्ण कराल. गोड बोला, यश मिळवा. नोकरीत वर्चस्व, लाभ. धंद्यात राग वाढू देऊ नका. मोह नको. कोणताही वाद वाढू देऊ नका. चांगली संधी त्यामुळे हुकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांवर नजर ठेवा. जवळच्या व्यक्ती काडय़ा घालतील.  शुभ दि. 8, 9

तूळ – प्रसंगावधान ठेवा

चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, बुध-गुरू युती. उतावळेपणा नको. आत्मविश्वास वाढेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. कायदा मोडू नका. नोकरीमध्ये कामात चूक नको. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात हिशेब तपासा. अहंकारी भाषा नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नम्रता ठेवा. प्रसंगावधान ठेवा. वेळ आल्यास गप्प रहा, पण प्रतिष्ठा जपा. योग्य व्यक्ती तुमची बाजू घेईलच. चांगला दिवस 12, 13

वृश्चिक – नोकरीत हुशारी दिसेल

वृश्चिकेच्या अष्टमेषात गुरू. चंद्र-मंगळ त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातलाच कठीण, महत्त्वाची कामे करून घ्या. विरोधक दबा धरून बसेल. प्रकृतीची काळजी घ्या. नात्यात-मैत्रीत तणाव, गैरसमज. अनाठायी खर्च टाळा. वस्तू हरवू नका. नोकरीमध्ये हुशारी दिसेल. धंद्यात निश्चित धोरण ठरवणे कठीण वाटेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत देशी-परदेशी करारात सावध रहा. कायदा पाळा. प्रतिष्ठा जपा. चांगला दिवस 9, 10

धनु – धंद्यात चर्चा सफल

धनुच्या सप्तमेषात गुरू. बुध-गुरू युती. आत्मविश्वास वाढेल. नवीन परिचय प्रेरणादायक, सहाय्य करणारे वाटतील. कोणताही निर्णय घाईत नको. नोकरी टिकवा. कामात नकळत चूक होईल. धंद्यात चर्चा सफल, लाभ, परंतु करार लांबवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोध. कमीपणा मिळेल. तुमच्या धाडसाचे व डावपेचांचे गुपित उघड करू नका. तयारी करा, संधी मिळेल. वाट पहा. चांगला दिवस 13, 14

मकर – वक्तव्य करताना सावध रहा

बुध-प्लुटो षडाष्टक योग. बुध-शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला कोणतेही काम करून घेण्याचा प्रयत्न करा. सगळे जण जणु आपल्या विरोधात उठले आहेत असा विचार मनात येईल. नोकरी टिकवा. धंद्यात गोड बोला, फसगत टाळा. कोणतेही वक्तव्य करताना चौफेर सावध रहा. कायदा पाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. शत्रू कोण, मित्र कोण याचा अंदाज घ्या. चांगला दिवस 8,9

कुंभ – अहंकारसंताप नको

सूर्य-चंद्र प्रतियुती. बुध-गुरू युती. क्षुल्लक कारणामुळे कामे होताना अडचणी येतील. अहंकार-संताप करू नका. थोडी चांगल्या संधीची वाट पहा. निर्णयाची घाई नको. मित्र, आप्तेष्ट मदत करतील. नोकरीत दगदग, संताप. धंद्यात लाभ. चर्चेत यश. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आरोप होतील. तुमचे अभ्यासपूर्ण मुद्दे विचारात घेण्यास विलंब होईल. प्रवासात काळजी घ्या. संततीसंबंधीचा प्रश्न विचारात टाकेल. चांगला दिवस 9,10

मीन – आळस करू नका

मीनेच्या सुखेषात गुरू. चंद्र-बुध प्रतियुती. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. कायद्याचे भान ठेवून बोला, वागा, कृती करा. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. नवा परिचय वाढेल. धंद्यात फायदा, चर्चेत हुशारी दाखवाल. आळस करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रेरणादायक, आत्मविश्वास वाढवणारे वातावरण. वरिष्ठांशी संबंध दृढ होतील. पदाची आशा पूर्ण होईल. योजनांना गतीमध्ये ठेवा. चांगला दिवस 9, 10

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.