दीपिका पदुकोण अल्लू अर्जुनसोबत दिसणार
Marathi June 08, 2025 01:26 PM

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत दीपिका आगामी चित्रपटात दिसणार आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’चा दिग्दर्शक एटलीच्या एए22एक्सए6 या चित्रपटात दीपिका दिसणार आहे. शनिवारी चित्रपट निर्मात्याने एक स्पेशल व्हिडीओ शेअर करून दीपिका पदुकोणचे चित्रपटात स्वागत केले आहे. या व्हिडीओत एटली आणि दीपिका चर्चा करताना दिसत आहेत. या चित्रपटाला 2026 मध्ये प्रदर्शित करण्याची तयारी चित्रपट निर्मात्याने चालवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.