HOUSEFULL 5 COLLECTION:'स्टोरी नाही पण मसाला आहे!' अक्षय कुमारच्या हाऊसफूल 5 चित्रपटाची तुफान कमाई! 2 दिवसात कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला
esakal June 08, 2025 06:45 PM

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांचं त्रिकुट असलेला हाऊसफुल 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दरम्यान या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटीची कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी 30 कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी चित्रपाटी कमाई ही 25 टक्के जास्त आहे. दोन्ही दिवसाची मिळून चित्रपटाचं कलेक्शन 54 कोटी इतकं झालंय.

शनिवारी या चित्रपाटने 30 कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची कथा खास नसली तरी अक्षय कुमारच्या विनोदाला नेटकऱ्यांनी पसंती दाखवल्याचं दिसून येतय. आतापर्यंत या चित्रपटाने 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे.

हाऊसफुल 5 मध्ये बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन या तिघांनी धमाल अभिनय केलाय. तर जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी यांनी आपल्या ग्लॅमरस अदांनी चित्रपटाला चारचांद लावले आहे. चित्रपटात नाना पाटेकर यांनी आपल्या विनोदातून प्रेक्षकांचं खेळवून ठेवलं. तर संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांचा वेगळा अंदाज पहायला मिळाला.

माहितीनुसार हाऊसफुल 5 चं बजेट 225 कोटींचं आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर दोन दिवसात चित्रपटाने 50 कोटींची कमाई केल्यामुळे येत्या काही दिवसात चित्रपट बजेटचे पैसे देखील वसूल करेल यात काही शंका नाही. हाऊसफुल 5 हा काही दिवसांनी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.