राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे. डॉबरमॅन कुत्र्याच्या गळ्यात सुपारीची माळ घालत लक्ष्मण हाके यांचा फोटो लटकावला आहे.
Vaishnavi Hagawane Case LIVE Updates: पुणे पोलिस घेणार हगवणे बंधूंचा ताबावैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा ताबा पुणे पोलिस घेणार आहेत. शशांक हगवणे याच्यावर वारजे पोलिस ठाणे तर सुशीलवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांनी मंगळवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही भावांमध्ये युती होणारMaharashtra LIVE Updates: राज-उद्धव ठाकरे भाऊ एकत्र येतील का? या चर्चा काही दिवसापासून सुरु आहे. मनसे-ठाकरे गटाकडून सकारात्मक चर्चा सुरु असताना नवीन अपडेट समोर येत आहे.दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमातून चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही भावांमध्ये युती होईल, असे सध्याचे चित्र आहे.
Bihar News: तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात वाचलेबिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मध्यरात्री अपघातातून थोडक्यात वाचले. त्यांच्या गाडीच्या ताफ्याला एका ट्रकने जोरदार धक्का दिला. यात तेजस्वी यादव यांच्या सोबतचे पोलिस आणि वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वैशाली जिल्ह्यात हाजीपुर-मुजफ्फरपूर रस्त्यावर घडली. जखमींवर उपचार सुरु आहेत.
रायगडावर शिवपुतळ्याजवळ चिखल, शिवप्रेमींचा संतापकिल्ले रायगडावरील होळीच्या माळावरील शिवपुतळ्या जवळ लावलेल्या बॅरेगेटींग समोर मोठ्याप्रमाणात चिखल साचला आहे. यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. चिखलात माखलेले पाय शिवपुतळ्याच्या चबुतऱ्यावर गेल्यामुळे त्याठिकाणचा परिसरह अस्वच्छ झाला आहे. याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा आणि वरिष्ठ वकील, बीजेडीचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांनी जर्मनीत गुपचूप लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. नव विवाहित जोडप भन्नाट नृत्य करताना दिसत आहे.
Supriya Sule News: सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बनेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनखासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्याहून भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करण्यात आली. या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
Navi Mumbai: युवा सेना आपल्या दारीमुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवी मुंबईतील मुंबईकरांची समस्या जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न युवा सेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवा सेनेने मोर्चे बांधणी सुरु आहे.