निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः सरस्वती विद्यालय कांजूर येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक स्वप्नील गोसावी, शिक्षिका नेहा गाडेकर, चंद्रप्रभा कांबळे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह विजय तोडणकर, रमेश कोचरेकर, तुकाराम जगदाळे, नानासाहेब पुंदे, उत्तम गंगावणे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.