अभियांत्रिकी प्रवेश परिक्षा जेईई अॅडव्हान्स चा निकाल जाहिर झालेला आहे. IIT मध्ये प्रवेश प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पुढचे मोठे पाऊल म्हणजे JoSAA काउन्सिलिंग. जाईंट सिट अलोकेशन ऑथोरिटीने (JoSAA) 03 जून 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात केली.
JoSAA काउन्सिलिंगद्वारे देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल. यावर्षी काउन्सिलिंग नोंदणी आणि कॉलेज/ कोर्स निवडण्याची शेवटची तारीख 12 जून 2025 आहे. अशावेळी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे.
जेईई अॅडव्हान्स 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार JoSAA काउन्सिलिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. याद्वारे ते आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि जीएफटीआय सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात.
पहिली मॉक सीट अलॉटमेंट यादी 9 जून 2025 रोजी येईल. दुसरी मॉक लिस्ट 11 जून 2025 रोजी जाहिर होईल.
• दहावी आणि बारावीचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट • जेईई मेन किंवा अॅडव्हान्स हाॅल तिकिट • कॅटॅगरी किंवा पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (लागू असल्यास) • मेडिकल सर्टिफिकेट • बँक डिटेल्स (रिफंडसाठी) • पासपोर्ट किंवा ओसीआय/पीआयओ कार्ड (लागू असल्यास)
एससी, एसटी आणि दिव्यांग कॅटॅगरीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 20,000 आहे.
जनरल, ओबीसी-एनसीएल आणि ईडब्ल्यूएस कॅटॅगरीमधील विद्यार्थ्यांसाठी हे फी 45,000 निश्चित करण्यात आले आहे.
• काउन्सिलिंग अर्ज करण्यासाठी सुरुवात: 3 जून 2025 (सायंकाळी 5 वाजल्यापासून)
• अंतिम तारीख: 12 जून 2025
मॉक अलॉटमेंट: 9 आणि 11 जून 2025
1. प्रथम josaa.nic.in या वेबसाईटवर जा.
2. होमपेजवर दिलेल्या “JoSAA Counselling 2025 Registration” लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा जेईई मेन किंवा जेईई अॅडव्हान्सचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
4. आता तुम्हाला हवे असलेले काॅलेज आणि कोर्स निवडा आणि प्राधान्यक्रमानुसार ते सेट करा.
5. सर्व माहिती भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत डाउनलोड करुन तुमच्याकडे ठेवा.