Jagannath Rath Yatra:'जय जगन्नाथ' च्या गजरात भक्तांनी ओढले रथ; बहुदा यात्रेने रथयात्रेची सांगता
esakal July 06, 2025 05:45 PM

पुरी : श्री गुंडीचा मंदिरासमोर उभ्या असलेल्या देवता आरूढ झाल्यानंतर शनिवारी बहुदा यात्रेने भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची सांगता शनिवारी झाली

पहांडी विधीनंतर भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या प्रतिमा अनुक्रमे तलध्वज, दर्पदालन आणि नंदीघोष रथांवर स्थापित करण्यात आल्या.‘पहांडी’ हा शब्द ‘पदमुंडनम’ या संस्कृत शब्दातून तयार झाला आहे.यामध्ये एक-एक पाऊल उचलून देवतांना सावकाशपणे बाहेर आणले जाते.

तीन देवतांच्या पहांडीची सुरुवात चक्रराज सुदर्शनाने झाली. हा विधी आधी दुपारी १२ वाजता सुरू होणार होता, परंतु वेळेच्या दोन तास आधी सकाळी दहा वाजता सुरू झाला. औपचारिक मिरवणूक सुमारे दोन तास चालली आणि त्यानंतर देवतांना रथावर बसवण्यात आले.

गुंडीचा मंदिरापासून मुख्य मंदिरापर्यंत भाविकांनी ‘जय जगन्नाथाच्या’ जयघोषात तिन्ही रथ ओढले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी बहुदा यात्रेनिनमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

Amit Shah: सहकार विद्यापीठ घराणेशाही रोखेल; सहकारमंत्री अमित शहा यांचे गुजरातमध्ये प्रतिपादन

गुंडीचा मंदिराजवळ २९ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर बहुदा यात्रेला मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी दहा हजार कर्मचारी तैनात केले. त्यात सहा हजार १५० आणि ‘सीएपीएफ’चे ८०० कर्मचारी होतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.