CA Result: 'सीए'च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले
esakal July 07, 2025 07:45 AM

मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) मे महिन्यात झालेल्या सीए (चार्टर्ड अकाउंट्स) च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. यात ऑल इंडिया रँकमध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा (८६ टक्के) हा देशात प्रथम आला आहे. कोलकता येथील निशिता बोथरा (८३.८३ टक्के) आणि मुंबईतील मानव शहा (८२.१७ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. या परीक्षेत १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँक

चार्टर्ड अकाउंट्स इंटरमीजीएट ऑल इंडिया टॉपरमध्ये मुंबईतील दिशा गोखरू पहिली, दुसऱ्या स्थानावर छत्रपती संभाजीनगर येथील संदीप देवीधान, तिसऱ्या स्थानावर जयपूर येथील यास्मीन जैन आणि चौथ्या स्थानावर उदयपूर येथील निलय डांगी आहेत. या परीक्षेत ग्रुप-१ चा एकूण निकाल १४.६७ टक्के, ग्रुप-२ चा निकाल २१.५१ टक्के आणि दोन्ही ग्रुपचा निकाल १३.२२ टक्के इतका लागला. मे महिन्यात झालेल्या सीएच्या फाउंडेशन परीक्षेचा निकालदेखील आज जाहीर झाला असून या परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये गाझियाबाद येथील वृंदा अग्रवाल देशात प्रथम आहे तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मुंबईतील यज्ञेश नारकर आणि ठाण्यातील शार्दुल विचारे आहेत. या परीक्षेला नोंदणी केलेल्यांपैकी एकूण १५.०९ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

तिसऱ्यांदा देशात अव्वल

देशात पहिल्या आलेल्या राजन काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळविले आहेत. राजन हा सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे. जुलै २०२१ मध्ये सीए फाउंडेशनमध्ये आणि मे २०२२ मध्ये सीए इंटरमिजिएटमध्ये त्याने देशातून पहिला क्रमांक पटकावला होता. राजन सध्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेमध्ये इंडस्ट्रिअल ट्रेनी म्हणून कार्यरत आहे.

Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालं

सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज एक ठरावीक वेळ अभ्यासाला दिला पाहिजे. सातत्याने सात-आठ तास अभ्यासातूनही यश मिळवता येते. त्यासाठी आयसीएआयच्या अभ्यासक्रम मेटेरीयल्सलाही प्राध्यान्य दिले पाहिजे.

- राजन काबरा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.