Curd : रिकाम्या पोटी दही खाणे हाडांसाठी फायदेशीर
Marathi June 09, 2025 08:25 PM

भारतीय आहारात दही हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच दही खायला आवडते. दही आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ आहे. दह्यात निरोगी बॅक्टेरिया आढळतात, जे तुमच्या निरोगी आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दह्यात प्रोबायोटिक्स, प्रथिने, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषकतत्वे आढळतात. यासोबत दह्याच्या सेवनाने पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेचे आरोग्य सुधारते. हाडांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञमंडळी दही रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला देतात. चला तर मग जाणून घेऊयात, दररोज रिकाम्या पोटी दही खाणे कसे फायद्याचे ठरते.

हाडांसाठी ठरते वरदान –

दह्यामध्ये कॅल्शियम आढळते. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक घटक आहे. जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत करायची असतील तर दररोज रिकाम्यापोटी दही खायला हवे.

दह्याचे इतर फायदे –

  • दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनसंस्था निरोगी ठेवतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी दही उपयुक्त ठरते.
  • दही पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी दही खायला हवेत.
  • दह्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन सारख्या समस्या कमी होतात.
  • जर तुम्ही वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर दह्याचे सेवन करावेत. दह्यामध्ये पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन वाढत नाही.
  • दह्यामध्ये प्रोटिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करते आणि वजन नियंत्रणात राहते.
  • दही त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेवरील डाग, सुरकुत्या कमी होतात.
  • दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्या आणि मेंदूच्या अक्षावर सकारात्मक प्रभाव टाकतात, ज्यामुळे मूड सुधारतो.

दह्याचे सेवन कसे करावे?

  • दही रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता.
  • जेवणानंतर दही खाणे खाऊ शकता.
  • दही विविध प्रकारे खाता येईल. जसे की, लस्सी, रायता.

 

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.