Mumbai News: मोबाइलसाठी हट्ट, आई-वडिलांचा नकार; १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
Saam TV June 10, 2025 05:45 AM
संजय गडदे, मुंबई

१४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही त्यामुळे या मुलीने टोकाचे पाऊल उचललं. राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. १४ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडिलांकडे या मुलीने मोबाइलसाठी हट्ट केला. मोबाइल न दिल्यामुळे मुलीचे आई-वडिलांशी भांडण केले.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही मुलगी आई-वडिलांकडे सातत्याने मोबाइलची मागणी करत होती. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता दुपारी दोन वाजता या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. आरे कॉलनीतील युनिट २२ मधील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलिस करत आहेत. फक्त मोबाइलच्या हट्ट्पायी मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गोरेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.