-Rat९p१०.jpg-
२५N६९३२२
रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिल्पा सुर्वे यांचे अभिनंदन करताना अनिल दांडेकर. सोबत सतीश दळी, अॅड. श्रीकांत भाटवडेकर.
---
‘मसाप’ रत्नागिरी शाखाध्यक्ष सुर्वे
नवी कार्यकारिणी; बालसाहित्य संमेलन भरवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी लेखक अनिल दांडेकर, सचिव म्हणून अॅड. श्रीकांत भाटवडेकर आणि खजिनदारपदी श्रीकृष्ण तथा सतीश दळी यांची निवड झाली.
शाखेच्या सभेमध्ये ही सर्वानुमते निवड केली असून, वर्षभरातील विविध कार्यक्रमांची आखणी या वेळी करण्यात आली. यामध्ये बालसाहित्य आणि विविध स्पर्धा, उपक्रम या विषयी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये झालेल्या या सभेची सुरुवात झाली. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळामध्ये सदस्य म्हणून राजेंद्र कदम, मनोहर जोशी, संजीव लिमये, महेश सामंत, डॉ. चित्रा गोस्वामी, राधिका चव्हाण, मनाली नाईक, पांडुरंग बर्वे आणि पंकज शिंदे यांनी निवड करण्यात आली. नवी कार्यकारिणी पुढील तीन वर्षासाठी काम करणार आहे.
सुर्वे म्हणाल्या की, शाळेतील लहान मुलांसाठी बालसाहित्य संमेलन या वर्षी आयोजित करू. त्या दृष्टीने समिती गठित करून नियोजन करूया. कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. सचिव अॅड. भाटवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.