Housefull 5 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या 'हाऊसफुल 5'ची जादू फेल, ६व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी
Saam TV June 12, 2025 03:45 PM

'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. चित्रपटाला अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन यांची कॉमेडीने चारचाँद लावले आहे. 'हाऊसफुल 5' हा चित्रपट सुरुवातीपासून त्याच्या दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 6

'' चित्रपट आता लवकरच 120 कोटी रुपयांचा व्यवसाय करणार आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. मात्र आता दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'चा तबल 225 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे सहाव्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8 कोटी रुपये

  • एकूण - 119.75 कोटी रुपये

अक्षय, रितेश आणि अभिषेकसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.'हाऊसफुल 5' थिएटरमध्ये गाजल्यावर घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.