IPL 2025 Revenue:२०००००००००००; BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा; विजेत्या RCBला दिला नाही १ टक्काही वाटा
esakal June 11, 2025 04:45 AM

BCCI IPL 2025 profit and revenue model : इंडियन प्रीमिअर लीगचे १८ वे पर्व नुकतेच पार पडले... ३ जूनला ने त्यांच्या आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवला.. १७ वर्षांच्या प्रयत्नानंतर RCB ला पहिले जेतेपद पटकावता आले. विराट कोहलीचा संघ फायनलमध्ये पोहोचल्याने स्पर्धेचा TRP पण वाढला होता आणि त्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) आर्थिक फायदा झाला. पण, बीसीसीआयला जेवढा महसुल मिळाला, त्याच्या १ टक्केही वाटा विजेत्या RCB ला मिळालेला नाही.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सला पराभूत केले. जेतेपदाची ट्रॉफी उंचावताना विराट भावनिक झालेला, रडलेला, सर्वांनी पाहिला. पण, च्या या पर्वातून बीसीसीआयला किती महसुल मिळाला? आयपीएलचे मीडिया हक्क विकून बीसीसीआयाने आधीच ९६७८ कोटी कमावले होते. त्यांना प्रती सामना १३०.७ कोटी मिळाले. त्यात बीसीसीआयने डिजिटल व टीव्ही यांच्या प्रसारणाचे हक्क वेगवेगळे विकल्याने, त्यांच्या महसुलात आणखी भर पडली.

आयपीएल प्रक्षेपणाचे टीव्हीचे हक्क स्टार स्पोर्ट्सने, तर डिजिटल हक्क रिलायन्स इंडस्ट्रीच्या Viacom18 ने जिंकले. त्यानंतर स्पॉन्सरशीप फीमधून बीसीसीआयला ५०० कोटींचा फायदा झाला. टाटाने २०२४ ते २०२८ या कालावाधीसाठी स्पॉन्सर हक्क २५०० कोटींत जिंकले आहेत. याशिवाय बीसीसीआयने My11Circle, Angel One, RuPay; Strategic Timeout Partner — CEAT; Official Umpire Partners — Wonder Cement; and Orange & Purple Cap Partner — Aramco यांच्याकडूनही चांगली रक्कम घेतली आहे.

या व्यतिरिक्त तिकिटांच्या विक्रीतूनही बीसीसीआयला काही महसुल मिळाला. बीसीसीआयला प्रत्येक फ्रँचायझीच्या स्पॉन्सरशीपमधील आणि तिकिट महसुलातील अनुक्रमे २० व १२.५ टक्के वाटा मिळतो. बीसीसीआयने निश्चित केंद्रीय महसुलातून प्रत्येक फ्रँचायझीला ४२५ कोटींचा वाटा दिला आहे.

या सर्व गणितांची गोळाबेरीज केल्यास आयपीएल २०२५ मधून बीसीसीआयने २०,६८६ कोटी कमावले आहेत, २०२३ मध्ये हाच महसुल १६,४९३ कोटी इतका होता. मागच्या वर्षीही बीसीसीआयने २० हजार कोटींच्या आसपास महसुल कमावला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.