ओडिशामध्ये बलात्काराचा आरोपी ठार
Marathi June 11, 2025 02:25 PM

वृत्तसंस्था/ कटक

ओडिशाच्या गजपति जिल्ह्यात बलात्काराचा आरोपी असलेल्या 60 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली आहे. तसेच संबंधिताचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना अटक केली असून यात 8 महिला आणि दोन पुरुष सामील आहेत.

पोलिसांनी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील जगंलात मृतदेहाचे अवशेष हस्तगत केले आहेत. तर या हत्येप्रकरणी ज्या महिलांना अटक करण्यात आली आहे, त्या सर्व लैंगिक शोषणाच्या शिकार ठरल्या होत्या असे पोलिसांनी सांगितले आहे. संबंधित इसम दीर्घकाळापासून महिलांचे शोषण करत होता. 3 जून रोजी त्याने एका 52 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता.  ही घटना समोर आल्यावर परिसरातील महिलांनी एक बैठक घेत आरोपीला ठार करण्याचा निर्णय घेतला. सर्व महिला आरोपीच्या घरी पोहोचल्या, त्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा जीव घेतला. या घटनेत दोन पुरुषांनीही महिलांना मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी संबंधित इसमाच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो परिसरातील महिलांना लक्ष्य करत होता. संबंधित महिलांना कधीच पोलिसांकडे मदत मागितली नाही. तसेच हत्या झालेल्या इसमाच्या विरोधात त्यांनी कधीच तक्रार नोंदविली नव्हती अशी माहिती गजपतिचे पोलीस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी दिली आहे.

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.