गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान टेकऑफ करताना कोसळलं. जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी आकाशात मोठा काळा धुर झाला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे.
अपघातावेळी नक्की कधी काय घडलं?1 वाजून 10 मिनिटांनी बोर्डिंग पूर्ण
एअर इंडियाची विमान AI-171 अहमदाबादहून लंडनला निघणार होतं. सगळ्या प्रवाशांची बोर्डिंग पूर्ण झाली. तसंच विमान टेकऑपसाठी तयार होते.
1 वाजून 17 मिनिटांनी विमानाने टेकऑप केलं. टेकऑपच्या काही मिनिटं उड्डाण सामान्य होतं. परंतु अचानक विमान कोसळलं.
विमानाचा पायलट कोण होतं?विमानात एकून 242 प्रवासी होते. ज्यामध्ये 230 हे महिला-पुरुष, 2 लहान मुलं आणि 12 क्रू मेमर्स असल्याची माहिती आहे. अपघातावेळी विमानचा पायलट-इन-कमांड सुमित सभरवाल आणि को-पायलट क्लाइव कुंदरच्या हातात होतं.
विमान कॅश होताच एअरपोर्टच्या इमरर्जन्सी टीमने घटनास्थळी धाव घेतली. ही विमान एका हॉस्पिटलवर क्रॅश झाल्याचं बोललं जातय.
अमित शाहानी घेतली अपघाताची माहिती.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधत अपघाताची माहिती घतेली.