Maharashtra Political Live Updates : कोरोना झाली तरी कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही : प्रकाश आबीटकर यांचा अजब दावा
Sarkarnama June 13, 2025 10:45 PM

Prakash Abitkar : कोरोना झाली तरी कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही : प्रकाश आबीटकर यांचा अजब दावा
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी अजब विधान केले आहे. कोरोना झाला तरी आता कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.