जालना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. जालना, बदनापूर, अंबड, जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही अनुभवायला मिळाला. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर जिल्ह्यातील फळबागायतदारांचं नुकसान देखील या पावसामुळे झालं आहे.
Nashik Live : नाशिकला आयटी पार्क बनवण्यासाठी मोठं पाऊल; 40 एकरवर आयटी पार्क उभारणार!नाशिकमध्ये लवकरच आयटी पार्क उभारणार – उद्योगमंत्र्यांची माहिती
आयटी पार्कसाठी महापालिकेने 15 एकर, तर एमआयडीसीने 25 एकर जमीन देण्याचे जाहीर
जिंदल कंपनीतील आगप्रकरणानंतर राज्य सरकारकडून सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश – प्री-मॉन्सूनपूर्व सर्व कंपन्यांची सुरक्षा तपासणी करा
कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने उचलले ठोस पाऊल, संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश
Pune Live : पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू; विमाननगरमध्ये मोठी कारवाईविमाननगर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेचा कठोर पवित्रा
नोटीस दिल्यानंतरही अतिक्रमण न हटवल्यामुळे महापालिकेने केली सक्त कारवाई
वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे त्रस्त नागरिकांनी अतिक्रमणांविरोधात महापालिकेकडे केली होती तक्रार
बेकायदेशीर हॉटेल्स, अनधिकृत बांधकामे व कार्यालयांवर महापालिकेची थेट कारवाई
Gold- Silver Rate Live: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढजळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दरात तब्बल 2 हजार 400 तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखालीदक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे उळे कासेगावच्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
Nanded Luve: केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्याहदगाव-नांदेड परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी गरज पडल्यास विधानसभेचे अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Mumbai Live: ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर आमचं समर्थन- वडेट्टीवारउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार याचे आम्ही स्वागत केलं आहे. कुटुंब एकत्र येत असेल तर काँग्रेसने समर्थन दिले आहे. ठाकरे-फडणवीस ही राजकीय भेट होती की वैयक्तिक भेट ही स्पष्ट नाही. ठाकरे बंधू एकत्र येणे हे भाजपला परवडणारे नाही, भाजप ते होऊ देणार नाही, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
Mumbai Live: आशिष शेलार यांच्यासमोरच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीपालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवर पडले. कांदिवली पूर्व परिसरातील फेरीवाले लोक आशिष शेलार यांना निवेदन देण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
Chhatrapati Sambhajinagar Rain Live Update: संभाजीनगर जिल्ह्यातून जोरदार पावसाला सुरुवातछत्रपती संभाजीनगर :
संभाजीनगर जिल्ह्यातून जोरदार पावसाला सुरुवात
सलग दोन दिवस वादळी वाऱ्यानंतर आज जोरदार पावसाला सुरुवात
काल आणि परवा सलग दोन दिवस झाला होता हलका पाऊस
आज चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विमान अपघातानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
- उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाशी संबंधित प्रश्न आणि विषयांवर बैठक
- नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाबाबत देखील बैठकीत होणार चर्चा
- मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित
Air India Plane Crash Live Update: जोपर्यंत ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत मी अचूक माहिती देऊ शकत नाही- अरिंदम दत्ताएक कार्यरत व्यावसायिक पायलट, अरिंदम दत्ता म्हणतात, "जोपर्यंत ब्लॅक बॉक्स सापडत नाही आणि त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकत नाही. आमच्या माहितीत असे आले की टेकऑफनंतरही लँडिंग गियर खाली होता; तो ५० ते ६० फूट वर असायला हवा होता आणि नंतर तो ३० ते ४० सेकंदात बुडाला. मोठ्या प्रमाणात इंधनासह, किमान ९०-१०० टन इंधन, म्हणजे विमानाचा पेट्रोल - तो निसर्गाने अत्यंत ज्वलनशील आहे आणि एका लहानशा ठिणगीने, तो बॉम्बसारखा होईल... सुरक्षा ऑडिट आम्हाला योग्य कारण देईल. दोन ते तीन कारणे असू शकतात: यांत्रिक, मानवी चूक किंवा हवामान. टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान, हे दोन्ही भाग खूप महत्वाचे आहेत. त्या ३० सेकंदात, कॅप्टनने मेडे कॉल दिला, म्हणून कॉकपिटमध्ये काहीतरी चालू होते आणि त्या काळात, त्याला कॉल करण्याची हिंमत होती..."
Air India Plane Crash Live Update: अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरूअहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू आहे.
Air India Plane Crash Live Update: मोदींनी अहमदाबाद रुग्णालयात एआय-१७१ विमान अपघातातील एकमेव वाचलेल्या आणि इतर जखमींची घेतली भेटमोदींनी अहमदाबाद रुग्णालयात एआय-१७१ विमान अपघातातील एकमेव वाचलेल्या आणि इतर जखमींची भेट घेतली आहे.
Air India Plane Crash Live Update: अहमदाबादमध्ये जे घडले ते अत्यंत धक्कादायक आहे- एम.ए. बेबीएआय-१७१ विमान अपघाताबद्दल, सीपीआय(एम) चे सरचिटणीस एम.ए. बेबी म्हणतात, "अहमदाबादमध्ये जे घडले ते अत्यंत धक्कादायक आहे. सीपीआयएमच्या वतीने, मी शोकग्रस्त कुटुंबाप्रती माझे मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी भारत सरकारला याची सखोल चौकशी करण्याची विनंती देखील करू इच्छितो..."
Live update: भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात स्वागत!रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त पुढाकारातून सुरु झालेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर' अंतर्गत ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ आज पहाटे कोल्हापूर स्थानकावर दाखल झाली.
Live : इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी प्रमुखाचा मृत्यूइस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे (आयआरजीसी) प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी हुसेन यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Live : इराण-इस्रायल तणावाचा परिणाम भारतातील विमानसेवेवर, दिल्ली विमानतळाचं वेळापत्रक कोलमडलंइराण-इस्रायल तणावामुळे इराण, इराकमधील हवाई क्षेत्र बंद झाल्याने दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांचे वेळापत्रक बाधित झाले आहे. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना आपल्या विमान कंपनीशी संपर्क साधण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Live : मोठे अपघात होऊनही सरकारच्या चेहऱ्यावर दुख: नाही; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीकामोठे अपघात होऊनही सरकारच्या चेहऱ्यावर दुख: नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे. या अपघाताची जबाबादारी घ्यायला कुणीही तयार नाही, असंही ते म्हणाले.
Ahmedabad plane crash Live : अमित शहांनी केली घटनास्थळाची पाहणीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमान अपघात स्थळाची पाहणी केली असून, मृतांचे डीएनए जुळविण्याच काम सुरु असल्याचे सांगितले.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली जखमींची विचारपूसपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी शासकीय रुग्णालयात विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले असून आधी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. यानंतर विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच आढावा बैठकही घेणार आहेत.
Ahmedabad plane crash Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी जाणारपंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळाला भेट देणार असून या अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमारची हॉस्पिटलमध्ये विचारपूस करणार आहेत