Raincoat : या टिप्स वापरून खरेदी करा बेस्ट रेनकोट
Marathi June 12, 2025 03:25 PM
पावसाळा सुरू झाला की, रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यासाठी दुकांनामध्ये गर्दी होऊ लागते. रेनकोटमुळे पावसात संपूर्ण शरीराचे भिजण्यापासून संरक्षण होते. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही रेनकोटचा वापर करतात. विशेष करून दुचाकी वाहन चालवताना रेनकोट खूप उपयुक्त ठरतो. लहान मुलांनाही पावसात रेनकोट घातला जातो. लहान मुलांचे तर रंगीबेरंगी, स्टायलिश रेनकोट बाजारात मिळतात. दरवर्षी नवनवीन प्रकार यात येत असतात. त्यामुळे उत्तम दर्जाचा रेनकोट खरेदी करायला हवा. रेनकोट खरेदी करताना केवळ फॅशन आणि आवडीचा विचार न करता त्याचा प्रकार, फिटिंग, लांबी आणि रंग या गोष्टी लक्षात घ्यायल्या हव्यात. ज्यामुळे पावसापासून संरक्षण तर होईलच शिवाय तुम्ही स्मार्टही दिसाल.
टिपा –
- नायलॉन किंवा पॉलिस्टर यासारख्या वॉटरप्रूफ मटेरियलपासून बनवलेले रेनकोट पावसासाठी निवडावेत. या मटेरियलपासून बनवलेल्या रेनकोटमुळे पावसापासून संरक्षण होते आणि तुम्ही भिजत नाही.
- काही जणांना रेनकोट घातल्यावर जास्त घाम येतो. अशावेळी तुम्ही हवेशीर रेनकोट निवडायला हवा. तुम्हाला जास्त घामाचा त्रास असेल तर जाळीचे अस्तर असणारे रेनकोट्स निवडावेत.
- रेनकोट सील आहेत का नाही हे नक्की तपासावेत. कारण सीलबंद शिवण असलेल्या स्टिचिंगमुळे पाणी आत जात नाही आणि तुम्ही भिजू शकता.
- रेनकोट योग्य आकाराचा असावा. खूप मोठा आणि खूप लहान नसावा. तुम्हाला रेनकोट घातल्यावर आरामदायी वाटणे आवश्यक आहे.
- तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार रेनकोटची डिझाइन निवडावी.
- रेनकोटचे मटेरियल पातळ आणि जाड अशा दोन प्रकारे येते. तुम्ही गरजेनुसार त्याची निवड करायला हवी. पण, जास्त पातळ मटेरियला रेनकोट खरेदी करू नये, ते फाटू शकते.
- रेनकोटच्या मटेरियलप्रमाणे त्याचे बटण किंवा झिप नीट तपासून घ्याव्यात.
- रेनकोट खरेदी करताना त्याच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे पॉकेट्स आहेत का नाही ते तपासा. यामुळे खिशात गाडीच्या चावा, पाकीट ठेवणे सोयीचे जाईल.
- पावसात भिजू नये यासाठी खूप जास्त लांबीचा रेनकोट खरेदी करण्यात येतो. पण, असे करणे टाळायला हवे. खूप लांब रेनकोट घातल्यावर चिखलात लवकर खराब होतो. त्यामुळे तुम्ही मध्यम आकाराच रेनकोट खरेदी करायला हवा.
- रेनकोट खरेदी करताना त्याला टोपी आहे का नाही तपासावे. नाहीतर तुम्हाला रेनकोटसोबत छत्रीही बाळगावी लागेल.
हेही पाहा –