Maharashtra Politics Live Update : लोकशाहीत दोन्ही नेत्यांना भेटण्याचा अधिकार, ठाकरे-फडणवीस भेटीवर सामंत यांची प्रतिक्रिया
Sarkarnama June 12, 2025 08:45 PM
Uday Samant : लोकशाहीत दोन्ही नेत्यांना भेटण्याचा अधिकार, राज-उद्धव भेटीवर सामंत यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असून घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आज ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची आल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशात लोकशाही असल्याने दोन्ही नेत्यांना एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस याठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते की अजून काही कामासाठी याबद्दल मला माहिती नाही. किंवा या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे याबद्दलही काही माहिती मला नाही. तशी माहिती असण्याचं कारण देखील नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.