पिंपरी, ता. १२ : आपला म्युझिकल ग्रुप प्रस्तुत सुमधुर हिंदी-मराठी गीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोत्यांना चित्रपटसृष्टीतील गीतांची मेजवानी मिळाली. त्यामध्ये गायक आणि गायिकांनी गायलेल्या गीतांचा समावेश असल्याने श्रोत्यांना चित्रपटसंगीतातील सुवर्णकाळाची अनुभूती मिळाली.
‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे शनिवारी (दि. ७) कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी राजा तिखे, गायक सौरभ साळुंके, अनिल गायकवाड, उद्योजक अखिलेश राजगुरू उपस्थित होते. यावेळी आर. के. फाऊंडेशनचे मंगेश पवार, राधा कृष्ण फाउंडेशनच्या कल्पना जगताप, राहुल लिमये, स्वरगंधारच्या अश्विनी वडके, अशोक गायकवाड, अक्षता मेलोडीजच्या अपर्णा काजुळकर या पाच संस्थांचा सन्मान केला. साधना देशपांडे, निशा शर्मा, अनिल शर्मा, दत्ता लोहार, मंगल लोहोर, अॅड. स्मिता शेटे, उषा शेटे आदी उपस्थिती होते.
नेहा दंडवते, अनिल घाडगे, सुचिता शेटे शर्मा, सीमा पोडाला, सुनिता हुंबरे, आनंद गायकवाड, अरुण सरमाने, दैवशाला घाडगे, श्रुती चिंतामणी, उमा मेनन, विद्या हजारे, प्रतिभा गायकवाड आदी कायकांनी सादरीकरण केले. कायक्रमात कलाकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीराली मांकड यांनी निवेदन केले.