IND Vs ENG 2nd Test – शुभमन गिलच्या विक्रमापुढे गावसकर, तेंडुलकर, कोहली सर्वच फेल! अशी कामगिरी करणारा आशिया खंडातला पहिलाच कर्णधार
Marathi July 04, 2025 12:25 AM

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबेस्टन येथे सुरू आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने (259) द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे. आशिया खंडातील कोणत्याच कर्णधाराला जो विक्रम करता आला नाही, तो विक्रम शुभमन गिलने आपल्या नावावर केला आहे. शुभमन गिल SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) द्विशतक ठोकणारा आशिया खंडातील पहिलाच कर्णधार ठरला. त्याने या विक्रमासोबत श्रीलंकेचा विस्फोटक माजी खेळाडू तिलकरत्न दिलशानचा कर्णधार म्हणून सेना देशांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्याने 2011 साली लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध 193 धावा केल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.