खामगाव मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा संकल्प मेळावा होता आहे. या मेळाव्यात कॉंग्रेसचे दिलीपकुमार सानंदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. ४० वर्षांपासून ते कॉंग्रेसमध्ये आहेत. तो प्रवास आज थांबेल. आजवर काँग्रेस ने भरभरून दिले आहे, मी सांगेन ती पूर्व दिशा होती. विलासराव देशमुख असताना मोठा निधी मिळाला. जी विचारसरणी काँग्रेसची तीच विचारसरणी अजित दादांची आहे. माझे कार्यकर्ते सत्तेत जावे, त्यांची कामे व्हावीत. म्हणून आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आज हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करत असल्याचे सानंदा यांनी सांगितले.
Uday Samant : लोकशाहीत दोन्ही नेत्यांना भेटण्याचा अधिकार, राज-उद्धव भेटीवर सामंत यांची प्रतिक्रियाउद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असून घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आज ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची आल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशात लोकशाही असल्याने दोन्ही नेत्यांना एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस याठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते की अजून काही कामासाठी याबद्दल मला माहिती नाही. किंवा या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे याबद्दलही काही माहिती मला नाही. तशी माहिती असण्याचं कारण देखील नाही, असे सामंत यांनी म्हटले आहे.