Maharashtra Political Live Updates : लवकर लग्न करावं : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची आदित्य ठाकरेंना वाढदिनी दिल्या शुभेच्छा!
Sarkarnama June 14, 2025 04:45 AM
Ahmedabad Air Plane Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉकस’ सापडला; अपघाताचे कारण समजणार

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्वपूर्ण उपकरणे असतात, त्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हाऊस रेकॉर्डर यांचा समावेश असतो. विमानाच्या ‘टेक ऑफ’ पासून विमान कोसळेपर्यंत वैमानिक आणि एटीएसमध्ये काय बोलणं झालं हे सगळं कॉकपिट व्हाऊस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होत असते. तसेच विमानातील विविध यंत्रणांची काय स्थिती होती, ते व्यवस्थित काम करत होती का, हा सगळा डेटा फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये टिपला जातो, त्यामुळे अहमदाबादमधील विमान अपघात नेमका कशामुळे झाला, हे कळू शकणार आहे.

Sanjay Shirsat : वडिलांना (उद्धव ठाकरे) त्रास होणार नाही, याची काळजी घ्या : संजय शिरसाट

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं. वडिलांना (उद्धव ठाकरे) त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना फार फार शुभेच्छा. भविष्यात आणखी मोठा नेता त्यांनी व्हावं, अशी आमच्या आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

Prakash Abitkar : कोरोना झाली तरी कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही : प्रकाश आबीटकर यांचा अजब दावा

देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी अजब विधान केले आहे. कोरोना झाला तरी आता कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.