Maharashtra Political Live Updates : नाशिक मध्ये डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती
Sarkarnama June 14, 2025 08:45 PM
नाशिक मध्ये डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन

नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील. त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्पर्श लाभलेला असेल. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या गठित करण्यात येतील. या संमेलनाचे कार्यालय नाशिक येथे १६ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाच्या माध्यमातून संमेलनाच्या तयारीचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. या संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे नियोजन करण्यात येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.