Panchang 13 June 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे
esakal June 13, 2025 04:45 PM

What is the shubh muhurat on 13 june 2025 :

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ जून २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ २३ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:०१

☀ सूर्यास्त -१९:०७

चंद्रोदय - २१:१२

⭐ प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

⭐ सायं संध्या -  १९:०७ ते २०:१७

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:२५

⭐ प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१८

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ -  १०:५६ ते १२:३५

⭐ यमघंट काळ - १५:५३ ते १७:३२

⭐ श्राद्धतिथी -  तृतीया श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०० ते दु.०३:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी डोरली खावू नये.

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:३७ ते ०९:१६

अमृत मुहूर्त-- ०९:१६ ते १०:५६

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास १४:३६ प.

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

गुरु अस्त सुरु आहे

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष -   कृष्ण

तिथी - द्वितीया (१४:३६ प. नं. तृतीया)

वार -   शुक्रवार

नक्षत्र -  पूर्वाषाढा (२२:३२ प. नं. उत्तराषाढा)

योग -  शुक्ल(१३:०७ प.नं. ब्रह्मा)

करण - गरज (१४:३६ प. नं. वणिज)

चंद्र रास - धनु(२८:४५ नं. मकर)

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- भद्रा २६:३९ नं., तृतीया श्राद्ध

  या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे.

  दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   देवीला फुटाणे व दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  दिशाशूल पश्चिम दिशेस असल्याने पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क , तुळ , धनु , कुंभ , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.