मुंबई : अमेरिकी बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर 787 अहो विमान (विमान) काही साधंसुधं विमान नाही. शेकडो प्रवाशांना घेऊन हजारो किलोमीटरचं हवाई अंतर सहज पार करतं. तर, दहाबारा तासांचा प्रवास सुखकारक व्हावा याची सर्व काळजी घेतली जाते, त्यामुळे या विमानांना उडते हवाई महालच म्हंटलं जातं. विमान अभियांत्रिकीतलं श्रेष्ठत्वाचा नमुना म्हणून बोईंगच्या या ड्रिमलायनर प्रवासी विमानांकडे पाहिलं जातं.असं असलं तरी यासोबत छोट्या मोठ्या समस्यांचं ग्रहण सुद्धा सुरुवातीपासून होतच. अहमदाबादमधील अपघात (Ahmedabad plane crash) हा 787 ड्रिमलायनर विमानाला झालेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा, सर्वात भीषण अपघात होता. ही विमानं सुरक्षित आहेत, या विमानांचे आयुष्य साधारण 40 वर्ष असते, हे केवळ 15 वर्षांचे होते म्हणजे हे विमान एक प्रकारे तरुण आहे, असेच म्हणता येईल.
जगात दोनच कंपन्या आहेत ज्या 100-500 प्रवासी क्षमतेची विमानं बनवतात. त्यातली एक आहे बोईंग तर दुसरी आहे एअरबस. त्यामुळे बोईंगविरोधात कुठे काहीही घडलं, काही आक्षेप घेतले गेले तर स्पर्धक असलेल्या एअरबसकडे बोट दाखवलं जातं. 15-20 वर्षांपासून बोईंगमधील काही समस्यांबाबत आवाज उठवला जातोय आणि एअर बस हे सर्व करतंय असा आरोप होतो. असं असलं तरी बोईंग 787-8 जगातील सर्वात सेफ विमानापैकी एक विमान आहे, असं तज्ञ सांगतात. 1 हजार 150 बोईंग-787 विमानं जगभरात प्रवाशांना घेऊन उड्डाण करत असतात. बोईंगमध्ये बऱ्याच तक्रारी येताना दिसतात ही वस्तुस्थिती आहे, मेन्टेनन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग इश्यू असल्याचे आरोप होतात, बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतात. काही व्हिसरब्लोअर यांचा मृत्यू झाला ज्यांनी आवाज उचलला होता, काही तर बोईंगमध्ये काम करणारी होती. बोईंग मोठी कंपनी होती, एफएए हे देखील बोईंगच्या बाजूनं होतं, असे संजय कर्वे (एव्हिएशन तज्ज्ञ आणि माजी मुख्य वैमानिक, महाराष्ट्र सरकार) यांनी म्हटलं.
– हे विमान बोईंगनं ड्रॉईंग बोर्डवर तयार केलं होतं
– बोईंग-737 मध्ये प्रवासी क्षमता 182 पर्यंत आणली, बोईंग-777 हे साधारण 350-450 प्रवासी घेऊन उडायचं
– या दोन्हीमध्ये जवळपास दुप्पट गॅप होती, अशा वेळी विमान वाहतूक कंपन्यांकडून मागणी झाली आणि बोईंगनं 787 विमान आणलं, ज्याची क्षमता 200-250 प्रवासी आहे.
– सुरुवातीला जपान एअरलाईन्स मध्ये आग लागल्याची घटना घडली होती, ज्यात 787 मध्ये बॅटरीचे इश्यू समोर आले होते
– आपल्याकडे 787 आले तेव्हा सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले होते, त्यानंतर ते दुरुस्त केले गेले
– या श्रेणीत हे विमान सर्वात अत्याधुनिक, आणि सेफ विमान मानलं जातं
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेतलाय. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCA ने एअर इंडिया कंपनीच्या बोइंग 787-8/9 विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. एअर इंडियाकडून तपासणीसंदर्भातला रिपोर्ट डीजीसीएला सुपूर्द करावा लागेल. टाटा असो की बोईंग दोन्ही कंपन्या आपलं नाव आपला ब्रँड जपण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे 265 लोकांचा जीव घेणारा अपघात का झाला याची कारणं शोधतील आणि आवश्यक ते बदल करतील ही थोडी तरी खात्री वाटते.
आणखी वाचा