काँग्रेसच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी भालचंद्र जाधव
esakal June 13, 2025 11:45 PM

70423

काँग्रेसच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी भालचंद्र जाधव

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः राष्ट्रीय काँग्रेसच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्री. जाधव हे काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनुसार प्रांताचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी श्री. जाधव यांना निवडीचे पत्र दिले आहे. पंधरा दिवसांच्या आत तालुका कार्यकारिणी निवड करून ती जिल्हाध्यक्ष ईर्शाद शेख यांच्याकडे देण्याचे देखील सुचित करण्यात आले आहे.
दरम्यान श्री. जाधव हे गेली अनेक वर्ष काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांनी युवक अध्यक्षपदी अनेक वर्षे काम केले आहे.
काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देखील ते पक्षातच कायम राहिले. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी विविध आंदोलने, उपोषणे केली आहेत. पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पक्षाला शेकडो वर्षाची पंरपरा आणि संस्कृती आहे. तळागाळात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आहेत. त्यांना एकत्र आणण्याचे काम येत्या काळात केले जाईल, असे श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.