…तर हिंदुस्थान फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र
Marathi June 14, 2025 01:24 PM

145 कोटींचा हिंदुस्थान फिफा वर्ल्ड कपसाठी यंदाही पात्र ठरू शकला नाही. हिंदुस्थानी फुटबॉल संघातील राजकारण पाहता तो पात्र ठरणार नाही, याची सर्वांना कल्पनाही होती. जागतिक दर्जाच्या सर्व सोयीसुविधा पुरवल्यानंतरही आपल्या फुटबॉल संघाने पात्रता फेरीत लाजीरवाणी कामगिरी करत तमाम हिंदुस्थानींना पुन्हा एकदा निराश केले. हिंदुस्थानी फुटबॉल संघ पुढची वीस वर्षेही वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकत नाही, असे भाकीत खुद्द हिंदुस्थानचे फुटबॉल तज्ञच वर्तवताहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला कोणताही घाम न गाळता फिफा वर्ल्ड कपमध्ये एण्ट्री मिळवायची असेल तर कतारप्रमाणे 2042 च्या फिफा वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. कारण फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणारा संघ थेट मुख्य फेरीसाठी पात्र ठरतो, पण फिफा वर्ल्डकपचा डोलारा पाहता त्याचा बजेट हिंदुस्थानी सरकारला सध्यातरी पेलवू शकत नाही.

यजमानपद मिळवणे जग कप पात्रता अवघड

फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद मिळवून कोणत्याही येरागबाळय़ाचे काम नाही. आयोजनासाठी लागणारी जागतिक दर्जाची स्टेडियम्स, अत्युच्च सोयीसुविधा आणि प्रभावी वाहतूक यंत्रणा महत्त्वाची असते. तसेच यजमानपद मिळवण्यासाठी एकाचवेळी जगभरातील अनेक श्रीमंत देश उत्सुक असतात. त्यामुळे यजमानपदासाठी उत्सुक संघ आपले सर्वस्व पणाला लावतात. यंदाचे वर्ल्ड कप अमेरिका, पॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे आयोजन करत आहेत तर 2030 चा वर्ल्ड कपही मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन हे युरोपियन देश मिळून करणार आहेत. तसेच 2034 च्या वर्ल्ड कप आयोजनासाठी सौदी अरेबियाने आतापासून आपली ताकद लावली आहे. 2038 च्या वर्ल्ड कप आयोजनाची संधी दक्षिण अमेरिका किंवा आफ्रिकन देशांना मिळू शकते. त्यामुळे  2042 किंवा 2046 च्या यजमानपदासाठी आशियाई देश पुन्हा प्रयत्न करू शकतात. तोपर्यंत हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाचीही प्रगती होईल, अशी अपेक्षा बाळगू शकतो.

जग कप आयोजनासाठी चतुर्थांश केले होते 220 अब्ज डॉलर्स खर्च

2022 चा वर्ल्ड कप कतारने एकटय़ानेच आयोजित करण्याचा पराक्रम केला होता. अवघ्या 27 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने आपल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पाण्यासारखा पैसा खर्च करत आधी वर्ल्ड कप आयोजनाची बोली जिंकली आणि त्यानंतर आयोजनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अतिभव्य आयोजन करणाऱ्या कतारने या आजवरच्या सर्वात महागडय़ा वर्ल्ड कप आयोजनासाठी 220 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 19 लाख कोटी रुपये खर्च केले होते. हा खर्च ऐकून कुणाचीही बोबडी वळू शकते. विशेष म्हणजे त्यांनी या छोटय़ाशा देशात सहा नवेकोरे स्टेडियम उभारले आणि तब्बल दहा लाख चाहत्यांच्या राहण्याची अद्भुत व्यवस्था उभारली होती. त्यांनी वर्ल्ड कप आयोजनासाठी जे काही केले ते दिमाखदारच केले होते.

हिंदुस्थानला अफगाणींनीही हरवले

हिंदुस्थानात गेल्या दशकभरात फुटबॉलच्या प्रगतीसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. अत्युच्च सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. तरीही हिंदुस्थानात फुटबॉल हा दारिद्रय़रेषेखालीच आहे. फुटबॉलची फारशी व्यवस्थाही नसलेल्या अफगाणिस्तानसारख्या देशाविरुद्ध हिंदुस्थानला एकही विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड कप पात्रता फेरीत आशिया खंडातून हिंदुस्थानच्या गटात कतार, कुवेत आणि अफगाणिस्तान हे देश होते आणि हिंदुस्थानला सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला. तेसुद्धा कुवेतविरुद्ध. पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानने कुवेतचा 1-0 ने पराभव केला. मात्र त्यानंतर हिंदुस्थानला एकही विजय नोंदविता आला नाही. पहिला सामना 0-0 अशा बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने चक्क हिंदुस्थानला 2-1 असे नमवण्याचा भीमपराक्रम केला होता. कतारने तर दोन्ही सामन्यांत हिंदुस्थानचा धुव्वा उडवला होता. तिसऱ्या फेरीत हिंदुस्थानला थायलंड आणि हाँगकाँग या संघाकडूनही मात खावी लागलीय. त्यामुळे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील खेळावरून हिंदुस्थानचे फुटबॉल किती अंधारात आहे, याची कल्पना येऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.