Dubai Tower Fire : दुबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग, सगळीकडे हाहा:कार; हजारो लोकांची धावपळ!
GH News June 14, 2025 09:06 PM

Dubai Tower Fire Broke Out : दुबईत एका गगनचुंबी इमारतीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीतून आगीचे लोट निघताना दिसत आहेत. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार दुबईतील टायगर टॉवर नावाच्या रहिवाशी इमारतीला शुक्रवारी (13 जून) भीषण आग लागल्याची घटना घढली. ही आग एवढी भीषण होती, ज्यामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला. या आगीमुळे आकाशात उंचच उच धुराचे लोट दिसत होते. विशेष म्हणजे गेल्या कित्येक तासांपासून ही आग विझविण्याचे प्रयत्न चालू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शुक्रवारी रात्री 9.30 वाजता ही आग लागली.

3800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

मिळालेल्या माहितीनुसार या आगीनंतर तत्काळ अग्नीशमन दल दाखल झाले. त्यानंतर युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या इमारतीत राहणाऱ्या जवळपास 3800 लोकांना सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. आग लागलेल्या या इमारतीचे नाव टायगर टॉवर असे असून या इमारतीच्या वरच्या काही मजल्यांवर ही आग लागली.

67 मजल्यांची इमारत, जीवितहानी नाही

ही आगीची घटना घडल्यानंतर दुबईतील स्थानिक नागरी सुरक्षा पथक रात्रीच्या 2.30 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. अजूनतही या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. आग लागलेली ही इमारत एकूण 67 मजल्यांची होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.