Dubai Fire – दुबईतील 67 मजली इमारतीला भीषण आग, 4 हजाराहून अधिक नागरिक रेस्क्यू
Marathi June 15, 2025 02:24 AM

दुबईतील मरीना परिसरातील 67 मजली उंच इमारतीत भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. इमारतीतून चार हजाराहून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. सुमारे सहा तास अथक प्रयत्न करून अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात कुणीही जखमी झाल्याचे किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.