US Firing – घरात घुसून दोन लोकप्रतिनिधींवर गोळीबार, घटनेत महिला खासदारासह पती ठार
Marathi June 15, 2025 03:24 AM

अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये घरामध्ये घुसून दोन खासदारांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात महिला खासदारासह तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे तर पुरूष खासदार जखमी आहे. स्टेट सिनेटर जॉन हॉफमन आणि स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह मेलिसा हॉर्टमन यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला टार्गेट हल्ला म्हटले आहे. जॉन हॉफमन हे हल्ल्यात जखमी झाले आहेत, तर मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचे पती या हल्ल्यात मरण पावले आहेत.

जॉन हॉफमन आणि मेलिसा हॉर्टमन यांच्या मिनियापोलिस उपनगरातील चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्क येथील घरांमध्ये घुसून हा गोळीबार करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर पोलिसाच्या वेशात आला होता. कोणत्या कारणातून हा हल्ला करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

पोलीस याबाबत तपास करत आहेत. तसेच पोलिसांच्या गणवेशात असलेल्या संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, संशयिताच्या कारमधून एक “जाहीरपत्र” जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींची नावे संभाव्य लक्ष्य म्हणून सूचीबद्ध आहेत, असे मिनेसोटा पोलीस प्रमुखांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.