पंजाब-पठाणकोटमधील घटना
वृत्तसंस्था/ पठाणकोट
भारतीय हवाई दलाच्या एम-17 अपाचे हेलिकॉप्टरचे शुक्रवारी पठाणकोटच्या नांगलपूर भागात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. काही तांत्रिक बिघाडामुळे खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याचे मानले जाते. त्यात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अपाचे हेलिकॉप्टरने पठाणकोट एअरबेसवरून उ•ाण केले होते. आतापर्यंत भारतीय हवाई दलाने आपत्कालीन लँडिंगच्या कारणांबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशनल आणि सुरक्षा प्रोटोकॉलचा हवाला देत भाष्य करण्यास नकार दिला.
पठाणकोट एअर फोर्स स्टेशनवरून उ•ाण घेतलेल्या हेलिकॉप्टरला तांत्रिक समस्या आल्याने मोकळ्या मैदानात खबरदारी म्हणून लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर उतरताना पाहून गावकरी घटनास्थळी जमले, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिसराला घेराव घालत गर्दीवर नियंत्रण मिळविले. यापूर्वी 6 जून रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचेही आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.