आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 जून 2025
esakal June 15, 2025 01:45 PM

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रात्री १०.४२, चंद्रास्त सकाळी ९.०२, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४७.

दिनविशेष -

  • १९९३ - संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त.

  • १९९६ - ‘एरियन रॉकेट’ फ्रेंच गयाना येथील कोअरू येथून यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले.

  • २००१ - ग्रॅंडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमचे राष्ट्रीय महिला ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद.

  • २००५ - अथेन्स सुपर ग्रां.पी. स्पर्धेत जमैकाच्या असाफा पॉवेलने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ९.७७ सेकंदांचा विश्वविक्रम केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.