नव्या फीचर्सचे नवे स्मार्टफोन्स
esakal June 15, 2025 01:45 PM

भारतात आघाडीवर असलेल्या या पाच कंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिअलमी, मोटोरोला तसेच इन्फिनिक्स या कंपन्यांनी नुकतेच नवे स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. रिअलमीने जीटी ७ मालिकेत रिअलमी जीटी ७, रिअलमी जीटी ७ ड्रीम एडिशन आणि रिअलमी जीटी ७ टी हे तीन दमदार स्मार्टफोन आणले आहेत. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात प्रथमच आलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ९४००ई प्रोसेसर, तब्बल ७,००० एमएएचची बॅटरी आणि १२० वॉटचा अल्ट्राचार्जर. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत ८जीबी, १२जीबीपर्यंत मिळणारी रॅम रिअलमी जीटी ७मध्ये मात्र तब्बल १५ जीबीपर्यंत, तर जीटी ७ ड्रीम एडिशनमध्ये १६ जीबीपर्यंत मिळणार आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी यामध्ये सोनी आयएमएक्स ९०६ कॅमेरा लेन्स असून जगात पहिल्यांदाच फोर-के अंडरवॉटर व्हिडिओ मोड दिला आहे.

मोटोरोलाने ग्राहकांना मोबाईलच्या माध्यमातून उत्तम फोटोग्राफी करता यावी, यासाठी प्रथमच ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देत मोटोरोला एज ६० हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. ३०पट एआय सुपर झूम, सोनी लॅटिया ७०० सी सेन्सर तसेच ६.७ इंची१.५K सुपर एचडी क्वाड-कर्व्ह्ड पीओएलईडी डिस्प्ले हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. सेल्फी कॅमेराही ५० मेगापिक्सलचा दिला असून, त्यातून फोर-के व्हिडिओ चित्रीकरण करता येणार आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० प्रोसेसर, ५५०० एमएएचची बॅटरी व ६८ वॉटचा अल्ट्राचार्जर, १२ जीबी रॅम दिली आहे.

किफायतशीर स्मार्टफोन उत्पादक कंपनी इन्फिनिक्सने जीटी ७ प्रो नवा गेमिंग स्मार्टफोन सादर केला. भारतीय तरुणांची गेमिंगमधील वाढती क्रेझ लक्षात घेता, या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप-स्तरीय प्रोसेसिंग, प्रगत थर्मल डिझाइन आणि इमर्सिव्ह कंट्रोल फिचर्सचा समावेश असून उत्कृष्ट गेमिंग परफॉर्मन्स देण्यावर भर दिला आहे.

त्यासाठी यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० अल्टिमेट प्रोसेसर देण्यात आला असून, जो ३.३५GHz चा प्रभावी क्लॉक स्पीड देतो. सतत गेमिंगमुळे स्मार्टफोन ओव्हरहीट होऊ नये, यासाठी हीट मॅनेजमेंटसह व्हीसी कूलिंग सिस्टिम दिली आहे. तसेच जीटी गेमिंग किट या मोबाईलसोबत मिळते. त्यातील कूलिंग फॅन ४५०० आरपीएम गतीने केवळ १० वॉट पॉवरवर चालतो.

भारतातील बजेट स्मार्टफोन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आयटेलने महिनाभरात एकापाठोपाठ किफायतशीर स्मार्टफोन लॉन्च केले. आयटेल ए९५पाठोपाठ बाजारात आलेल्या आयटेल ए९०ने मोबाइलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. कमीत कमी किमतीत आयवाना २.० या एआयआधारित स्मार्ट असिस्टंट, १०० दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरंटी आणि डीटीएस साउंड सिस्टिम देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये युनिसॉक टी७१०० प्रोसेसर दिला आहे. परफॉर्मन्सच्या दृष्टीने विचार केल्यास सुरुवातीला ॲप सुरू होण्यास थोडा वेळ जातो; परंतु पाच-दहा मिनिटे वापरत राहिल्यास सर्वच गोष्टी सहज परफॉर्म होतात. किमतीच्या तुलनेत या स्मार्टफोनमधील फीचर्स बऱ्यापैकी चांगले आहेत.

रिअलमी जीटी ७
  • डिस्प्ले : ६.७’’ एफएचडी+ १२० हर्ट्झ डिस्प्ले

  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ९४००ई प्रोसेसर

  • रॅम : ८ जीबी, १२ जीबी

  • स्टोरेज : २५६ जीबी, ५१२ जीबी

  • रिअर कॅमेरा : ५० + ५० + ८ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : ३२ मेगापिक्सल

  • बॅटरी : ७००० एमएएच (१२० वॉट)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड व्ही१५

  • रंग : आईससेन्स ब्लॅक, आईससेन्स ब्ल्यू, ॲस्टॉन मार्टिन ग्रीन

  • किंमत :

  • ८ जीबी+२५६ जीबी : ३९,९९९

  • १२ जीबी+२५६ जीबी : ४२,९९९

  • १२ जीबी+५१२ जीबी : ४६,९९९

मोटोरोला एज६०
  • डिस्प्ले : ६.७’’ पीओएलईडी क्वाड कर्व्हड् डिस्प्ले

  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० प्रोसेसर

  • रॅम : १२ जीबी

  • स्टोरेज : २५६ जीबी

  • रिअर कॅमेरा : ५० + ५० + १० मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : ५० मेगापिक्सल

  • बॅटरी : ५५०० एमएएच (६८ वॉट)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड व्ही१५

  • रंग : मायकोनस ब्ल्यू

  • किंमत :

  • १२ जीबी+२५६ जीबी : २४,९९९

इन्फिनिक्स जीटी ३० प्रो
  • डिस्प्ले : ६.७’’ एलटीपीएस १.५के एएमएलईडी डिस्प्ले

  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी ८३५० प्रोसेसर

  • रॅम : ८ जीबी + १२ जीबी

  • स्टोरेज : २५६ जीबी

  • रिअर कॅमेरा : १०८ + ८ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : १३ मेगापिक्सल

  • बॅटरी : ५५०० एमएएच (४५ वॉट)

  • ऑपरेटिंग सिस्टिम :

  • ॲण्ड्रॉईड व्ही१५

  • रंग : डार्क फ्लेअर आणि ब्लेड व्हाईट

  • किंमत :

  • ८ जीबी+२५६ जीबी : २४,९९९

  • १२ जीबी+२५६ जीबी : २६,९९९

आयटेल ए९०
  • डिस्प्ले : ६.६’’ आयपीएस एलसीडी डिस्प्ले

  • प्रोसेसर : युनिसॉक टी७१०० प्रोसेसर

  • रॅम : ४ जीबी

  • स्टोरेज : ६४ जीबी, १२८ जीबी

  • रिअर कॅमेरा : १३ मेगापिक्सल

  • फ्रंट कॅमेरा : ८ मेगापिक्सल

  • बॅटरी : ५००० एमएएच (१५ वॉट)

  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲण्ड्रॉईड व्ही१४

  • रंग : स्टारलाइट ब्लॅक, स्पेस टिटॅनियम, नेबुला ब्ल्यू

  • किंमत :

  • ४ जीबी+६४ जीबी : ६,४९९

  • ४ जीबी+१२८ जीबी : ६,९९९

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.