Maharashtra Live News Update: रायगड पुणे जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात वाहतुक कोंडी
Saam TV June 15, 2025 07:45 PM
पुणे पोलिसांकडून अवजड वाहनांवर १८ गुन्हे, प्रवेश बंदी मोडणाऱ्या चालक-मालकांविरोधात कारवाई

शहरातील ३२ महत्त्वाच्या चौकांवर प्रवेश बंदीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालक-मालकांविरोधात पुणे पोलिसांनी १८ गुन्हे दाखल केले आहेत.

गेल्या चार दिवसांत अवजड वाहनांमुळे दोन महिलांना प्राण गमवावे लागल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

Mega Block: गोंदिया - बल्लारपूर मार्गावर 8 तासांचा मेगा ब्लॉक

नागपूर विभागातील ब्रम्हपुरी - नागभीड मार्गा दरम्यान एका वळणाला मुख्य ट्रॅकशी जोडण्याचे काम सुरू असल्याने आठ तासांचा मेगा ब्लॉक करण्यात आला आहे.

यामुळे त्यामुळे गोंदिया - नागभीड - बल्लारशा ही महत्त्वाची पॅसेंजर आणि छत्तीसगड, तसेच दक्षिणेत जाणाऱ्या जलद गाड्या प्रभावित झाल्या आहेत.

यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली.

Karjat ST Bus: कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी! पाच नवीन एसटी बसेस कर्जत आगारात दाखल

कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन एसटी बसेस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या असून, या नव्या बसांचा लोकार्पण समारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला..

या बसेस कर्जत, पनवेल, खोपोली, शहापूर, वाशी, तुळजापूर या परिसरात नियमितपणे धावणार आहेत.

यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह व नियमित सेवा मिळणार आहे.

Matheran: माथेरानमध्ये झाडाची फांदी तुटून तीन पर्यटकांच्या वाहनांचे नुकसान

माथेरानमध्ये, पर्यटकांच्या गाड्यांसाठी असलेल्या पार्किंगमध्ये एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. 

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र पर्यटकांचे आर्थिक नुकसान झाले असून आता या वाहनांची भरपाई कोण देणार म्हणून प्रश्न पुढे आला आहे.

Raigad: रायगड पुणे जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात वाहतुक कोंडी

० पुणा हद्दीत रस्त्यावरील मोरी खचून त्या ठिकाणी ट्रक आडकल्याने घाट रस्त्यात वाहनांच्या रांगा

० रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

० प्रवासी आणि पर्यटक वाहतुक कोंडीत आडकले

Raigad Rain: शनिवारी दिवसभरात दक्षिण रायगडला पावसाने जोरदार झोडपल

० रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, पोलादपुर, श्रीवर्धन आणि म्हसळ्यात जोरदार पाऊस

० माणगाव 170 MM, सुधागड 126 MM, पोलादपुर 128 MM, श्रीवर्धन 1 43 MM आणि म्हसळ्यात 145 MM पावसाची नोंद

० हवामान खात्याने शनिवारी रायगडला पावसाचा रेड अलर्ट दिला होता

० काल रात्रभर पावसाचा जोर कायम होता मात्र सकाळी पावसाने उसंत घेतली असून पावसा रिपरीप सुरु आहे

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट

रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग

सकाळपासून सरींवर पाऊस

दक्षिण रत्नागिरी मध्ये पावसाचा जोर कायम

जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून

काजळी, अर्जुना, गोदावली दुथडी भरून

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 114 मिलिमीटर पावसाची नोंद

मंडणगड मध्ये सर्वाधिक 177 मिलिमीटर पाऊस

त्या खालोखाल गुहागर 140, दापोली 138, रत्नागिरी 123, लांजा 118 मिलिमीटर पावसाची नोंद

आज दिवसभर पावसाचा जोर कायम असणार

वाशिम जिल्ह्यात ५५ प्रकल्प कोरडेठाक; जलसाठा केवळ ११.३९ टक्केच

मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात काही भागांत दमदार पावसाची नोंद झाली, मात्र, जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाचे तसेच लघुपाटबंधारे प्रकल्प मात्र आजही तहानलेलेच आहेत. जिल्ह्यातील ९२ प्रकल्पांपैकी तब्बल ५५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. सध्या उर्वरित प्रकल्पात केवळ ११.३९ टक्केच जलसाठा उपलब्ध असून, अनेक प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने नदी-नाले वाहते झाले, विहिरींच्या पातळीत थोडी वाढ झाली असली, तरी मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात अजूनही दमदार मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

रायगड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोकणाला हावामान खात्याने रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अलिबागसह महाड, पोलादपूर, माणगाव भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळ पासून सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिप रिप सुरू आहे.

गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात अटक, ३ किलो गांजा जप्त

वाशिमच्या कारंजा शहराच्या बसस्थानकाजवळील टी-पॉईंट परिसरात पोलिसांनी सापळा रचून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहात अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून तब्बल ३ किलो ५५७.७ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, त्याची अंदाजे बाजार किंमत ५२ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात

आयर्न एव्हिएशनचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू

गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले

परभणी पोलिसांची मोठी कारवाई: जनावर चोरणारी टोळी गजाआड, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीला परभणी पोलिसांनी गजाआड केले आहे. कारवाईत पोलिसांनी १ म्हैस, चोरलेल्या शेळ्या विकून मिळालेले १.३५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली २ वाहने असा एकूण सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी परभणी जिल्ह्यातून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरल्याची, तसेच जालना जिल्ह्यातून इतर दोन साथीदारांच्या मदतीने एक म्हैस चोरल्याची कबुली दिली. पोलीसांच्या या कारवाईमुळे जनावर चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत

खेड- दापोली मार्ग रात्री वाहतूकीसाठी बंद

दस्तूरी ते साखरोळी पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद

खेड सुर्वे इंजिनिअरिंग येथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी

खेडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं नारंगी आणि जगबुडी नदिच्या पाणी पातळीत वाढ

Ulhasnagar: उल्हासनगर-अंबरनाथ शहरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर पावसाने उसंती घेतली होती

मात्र आज सकाळपासून उल्हासनगर अंबरनाथ शहरात ढगाळ वातावरण होते

आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट ठाणे जिल्ह्याला दिलेला आहे.

या शहरांमध्ये ढगाळ वातावरणामुळे आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Pune Orange Alert: पुणे जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट', पुढील २-३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

तीन दिवसांत पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांतही मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे पुण्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

असा आहे अंदाज

आज पुणे परिसरात कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर सोमवारी कमाल तापमानात किंचित वाढ होणार असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भोर महाड मार्गावरील जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे काम बंद आंदोलन

- भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपटी ते निगुडघर सुरु असलेले काम बंद पाडत केले आंदोलन

- अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकऱ्यांची बैठक लावुन प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

- भोर हद्दीतील वरंधा घाट ते शिंदेवाडी फाटा या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७२३ कोटी निधी मंजूर असलेल्या भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरूयं

- शेतकऱ्यांच्या जमिनी, दुकाने, घरे या रुंदीकरणात जात असून मोबदला दिला जात नसल्याने शेतकरी आक्रमक

वारी काळात चिकन मटनची दुकान पुण्यात बंद ठेवा, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना दिल्या निवेदन

पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज वसंत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्या दिवशी असतील त्या दिवशी पुणे शहराच्या हद्दीतील सर्व मटण, चिकन व दारू विक्री दुकाने बंद ठेवा 21 व 22 जून रोजी पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मुक्कामी थांबणार आहे.

लाखो भाविक व वारकरी या पालखी दर्शनासाठी पुण्यामध्ये येत असतात.

अशा आनंदमय वातावरणामध्ये पुणे शहरातील सर्व चिकन.मटन व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पुणे शहरात येणार आहेत.

त्यांना कोणत्या ही प्रकार अडचण येऊ नये. त्रास होऊ नये म्हणून आपण शहरातील मटण, चिकन, मद्य विक्री बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

मूळशीत ढगफूटी होऊन लवासा रस्त्याला नदीचे स्वरूप

मूळशी तालुक्यात आज ढग फूटी होऊन लवासा रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.

सायंकाळी सुमारे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या या पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आले होते.

त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक हैराण झाले.

उरवडे गावाच्या पुढे मुठा खिंडीकडे जाताना आंबेगाव हद्दीतील साई मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते.

मंत्री राठोड यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी

राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली.

नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ.

लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा,अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, बांधकामचे कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.