संगमेश्वर तालुक्यातील ९९९ मुले पहिलीत
नवागतांचे आज स्वागत ; कागदावर उमटवणार पाऊल
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १५ : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जूनपासुन होणार असुन जिल्हापरिषदेच्या शाळा गजबजणार आहेत. शाळेची पहिली घंटा सोमवारी वाजणार आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील शाळांचे व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. सोमवारी नवागतांचे स्वागत वाजंत्री वाजवून दिंडी तसेच प्रभातफेरी काढून होणार आहे. यावर्षी पहीलीला ९९९ मुलं दाखल होणार आहेत. या लहान मुलांसाठी शाळेत पहिले पाऊल पडणार आहे. हे पाऊल रंगाच्या माध्यमातून कागदावर उमटवले जाणार आहे. पालक हे जतन करुन ठेवणार आहेत. हा नवा उपक्रम तालुक्यात राबवला जाणार आहे. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व शूज यांचे पहिल्याच दिवशी वितरण होणार आहे. हे सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे. पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, कार्यक्षेत्र अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. पोषण आहाराबरोबरच मुलांना खावुचे वाटप होणार आहे. सर्व शाळांचा परिसर पुन्हा गजबजून जाणार आहे. शालोपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतुन गर्दी झाली होती.