कुंडमळा पूल दुर्घटना ही सरकारच्या नाकर्तेपणाची बेजबाबदारपणाची आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंचा सरकारवर संताप,कुंडमळा पुलावरून सुनावलेहा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? हा संतप्त संवाल राज ठाकरे यांनी कुंडमळा पूलाच्या
Fire on Daund-Pune Train : दौंड-पुणे रेल्वेला आगदौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या एका डब्यात आग लागली. ट्रेनच्या तिसऱ्या बोगीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले.
ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दरवाजा लाॅक झाल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. अखेर काही प्रवाशांनी सतर्कता दाखवून त्या दरवाज्याकडे धाव घेतली. आणि दरवाज्या तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाज्या तोडून आत आडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढले
इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये 244 नागरिकांचा मृत्यूइस्त्रायल इराण एकमेकांवर हल्ला प्रतिहल्ला करत आहेत. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणची प्रचंड हानी झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या हल्ल्यांमध्ये इराणीमधील 224 लोकांचा मृत्यू 1200 हून अधिक जखमी झाल्याचे इराणच्याच आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सरकारला जाग, घेतला मोठा निर्णयमावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटनेनंतर प्रशासन जागे झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
कुंडमळा पूल दुर्घटनेत चार जणांचा मृत्यूडमळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पर्यटकांच्या बचावासाठी सलग दुसऱ्या दिवशी एनडीआरएफकडून बचावकार्य राबवले जात आहे. दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे समोर आली आहे. चार जणांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.
kundmala bridge collapsed : कुंडमळा पूल दुर्घटना पावसाने शोधकार्यात अडथळामावळातील कुंडमळा येथे पूल पडून पर्यटक वाहून गेले होते. एनडीआरफकडून रविवारी दुपारीपासून शोधकार्य सुरू होते. आज (सोमवारी) पहाटेपासूनच पावसाचे जोर वाढल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. या दुर्घटनेत चार जणांना मृत्यू झाला. 51 जण जखमी झाले आहेत.